प्रत्येक घरात बियाणे बॅंक तयार करण्यासाठी प्रयत्न करणार : राहीबाई पोपेरे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते पद्मश्री पोपटराव पवार आणि बीजमाता राहिबाई पोपेरे यांना जीवनसाधना पुरस्काराने गौरविण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते पद्मश्री पोपटराव पवार आणि बीजमाता राहिबाई पोपेरे यांना जीवनसाधना पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुणे  ः संकरित बियाणे व रासायनिक खतांमुळे रोगराई निर्माण होत आहे. आपण आजारी पडलो, तर दवाखान्यात जाऊ. पण काळी आई आजारी पडली, तर आपण काय करणार, असा प्रश्‍न उपस्थित करीत बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी आता प्रत्येक घरात बियांची बॅंक तयार करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ संगीतकार पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष व हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे, अर्थतज्ज्ञ, खासदार डॉ. नरेंद्र जाधव, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, जनसेवा फाउंडेशनचे डॉ. विनोद शहा, पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे गिरीश प्रभुणे यांना ‘जीवनसाधना गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेत्री मुक्ता बर्वे, नाटककार धर्मरत्न सामंत व क्रिकेटपटू केदार जाधव यांना युवागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. जाधव यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांनी पुरस्कार स्वीकारला. या वेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, प्रभारी कुलसचिव डॉ. पराग काळकर, मित्सुबिशी कंपनीचे भारतातील प्रमुख इसाहिरो निशीमाटो या वेळी उपस्थित होते.

या वेळी श्री. पवार म्हणाले, की पाणी व्यवस्थापन म्हणजे केवळ पाणी अडवणे आणि जिरवणे एवढ्यावरच न थांबता यांच्यापलीकडे भूजलाचे योग्य व्यवस्थापन करावे लागणार आहे. ते जमले नाही तर भविष्यात देशात मोठे संकट उभे राहण्याचा धोका आहे, 

पुणेकर आम्हाला टोमणे मारत ः मंगेशकर लहानपणी आम्ही पुण्यातील लक्ष्मी रस्त्याने जाताना पुणेकर आम्हाला ‘धैर्यधराची मुले निघाली’ असे टोमणे मारत. मात्र आमच्यावर वडिलांनी आणि लतादीदींनी संस्कार केले आहेत. मी शाळा, महाविद्यालयात संगीत शिकलो नसलो, तरी लता मंगेशकर, आशा भोसले यांच्यासारख्या समर्थ गायिकांमुळे संगीताचा आनंद मिळाला, असे मंगेशकर यांनी सांगितले. आनंद देशमुख यांनी श्री. मंगेशकर यांची छोटेखानी मुलाखत घेतली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com