कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ बंधारे पाण्याखाली 

कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पडणाऱ्या सातत्यपूर्ण पावसाने जिल्ह्यातील ३१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बुधवारी (ता.८) दुपारी बारा वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्याची पातळी २२ फुट ६ इंच इतकी होती. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु होता. गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पडणाऱ्या सातत्यपूर्ण पावसाने जिल्ह्यातील ३१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बुधवारी (ता.८) दुपारी बारा वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्याची पातळी २२ फुट ६ इंच इतकी होती. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु होता. गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. 

पश्‍चिमेकडे पाऊस असला तरी पूर्व भागात मात्र ढगाळ हवामानाच होते. एक दोन तासांतून एखादी हलकी ते मध्यम स्वरुपाची सरी असे स्वरुप पूर्व भागात होते. गगगनबावडा, आजरा तालुक्‍यात थांबून मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु होता. धरणांतून गरजेनुसार पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. पावसाचा जोर वाढल्यासच धरणांतून जादा पाणी सोडण्याबाबत विचार होणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. 

बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत आजऱ्यात सर्वाधिक १०४ मि. मी. पाऊस झाला. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, इचलकरंजी, रुई, शिरोळ व तेरवाड, वारणा नदीवरील चिंचोली, भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे आणि खडक कोगे, वेदगंगा नदीवरील मसवे, शेळोली, गारगोटी, निळपण, वाघापूर, कुरणी, सुरूपली, बस्तवडे व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव, निलजी व ऐनापूर, घटप्रभा नदीवरील पिळणी, बिजूर भोगोली, हिंडगाव व कानडेसावर्डे बंधारे पाण्याखाली आहेत.  बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंतचा पाऊस (मि.मी.) ः  हातकणंगले - १० , शिरोळ- ९.७१ , पन्हाळा-२८.८६ , शाहूवाडी- ३७ , राधानगरी- ६५ , गगनबावडा-९८ , करवीर- १३.१८ , कागल- ४६.५७ , गडहिंग्लज- ४९.४३ , भुदरगड- ४७.४० , आजरा- १०४.२५ , चंदगड- ८५.५०    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com