Farming Agricultural News Marathi rainfall continue in district Kolhapur Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ बंधारे पाण्याखाली 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 जुलै 2020

कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पडणाऱ्या सातत्यपूर्ण पावसाने जिल्ह्यातील ३१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बुधवारी (ता.८) दुपारी बारा वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्याची पातळी २२ फुट ६ इंच इतकी होती. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु होता. गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. 

कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पडणाऱ्या सातत्यपूर्ण पावसाने जिल्ह्यातील ३१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बुधवारी (ता.८) दुपारी बारा वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्याची पातळी २२ फुट ६ इंच इतकी होती. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु होता. गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. 

पश्‍चिमेकडे पाऊस असला तरी पूर्व भागात मात्र ढगाळ हवामानाच होते. एक दोन तासांतून एखादी हलकी ते मध्यम स्वरुपाची सरी असे स्वरुप पूर्व भागात होते. गगगनबावडा, आजरा तालुक्‍यात थांबून मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु होता. धरणांतून गरजेनुसार पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. पावसाचा जोर वाढल्यासच धरणांतून जादा पाणी सोडण्याबाबत विचार होणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. 

बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत आजऱ्यात सर्वाधिक १०४ मि. मी. पाऊस झाला. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, इचलकरंजी, रुई, शिरोळ व तेरवाड, वारणा नदीवरील चिंचोली, भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे आणि खडक कोगे, वेदगंगा नदीवरील मसवे, शेळोली, गारगोटी, निळपण, वाघापूर, कुरणी, सुरूपली, बस्तवडे व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव, निलजी व ऐनापूर, घटप्रभा नदीवरील पिळणी, बिजूर भोगोली, हिंडगाव व कानडेसावर्डे बंधारे पाण्याखाली आहेत. 

बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंतचा पाऊस (मि.मी.) ः हातकणंगले - १० , शिरोळ- ९.७१ , पन्हाळा-२८.८६ , शाहूवाडी- ३७ , राधानगरी- ६५ , गगनबावडा-९८ , करवीर- १३.१८ , कागल- ४६.५७ , गडहिंग्लज- ४९.४३ , भुदरगड- ४७.४० , आजरा- १०४.२५ , चंदगड- ८५.५०  
 


इतर अॅग्रो विशेष
बुलडाणा जिल्ह्यातील १४ हजार शेतकरी मका...बुलडाणा ः जिल्ह्यातील १८ हजार ६८० शेतकऱ्यांनी मका...
दूध दरप्रश्‍नी राज्याचे केंद्र सरकारला...मुंबई: राज्यातील दूध दराचा तिढा सोडवण्यासाठी...
गोठवलेले शहाळ्यातील पाणी... तेही...शहाळ्यातील पाणी आपण नेहमी पितो. मात्र, तेच...
नव्या शिक्षणाची मांडणी शरद जोशींच्या...शरद जोशी जे म्हणतात ते महत्वाचे आहे की...
रेशीम शेतीला संजीवनीकोरोना लॉकडाउनचा फटका दुग्धव्यवसाय, कोंबडीपालन...
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...
‘भीमाघोड’ने उभारली सर्वांत मोठी कांदा...पुणे: भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन...
पावसाचा जोर आजपासून वाढणारपुणे ः उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व...
कापसाचे ६१४ कोटी थकीतनागपूर : राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...