Farming Agricultural News Marathi regional review meeting of agriculture department Nashik Maharashtra | Agrowon

कामाच्या माध्यमातून दिसावे कृषी विभागाचे प्रतिबिंब : कृषिमंत्री दादा भुसे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या प्रलंबित आहेत. त्या सोडवण्यासाठी मी स्वतः मध्यस्थी करेल. शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवल्यास ते तुमचा मनापासून सन्मान करतील. मात्र, त्यासाठी कृषी विभागाने कामामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.
— दादा भुसे, कृषिमंत्री

नाशिक  : विशिष्ट शेतकऱ्यांसाठीच कृषी विभाग काम करतो, असा आरोप होतो. कामामध्ये सर्वसामान्य गरजू शेतकऱ्यांची संख्या कमी असते, हे चित्र बदलायला हवे. तळागाळातील शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना योजनांचा लाभ देऊन कामाच्या माध्यमातून कृषी विभागाचे प्रतिबिंब दिसायला हवे, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.

नाशिक विभागीय कृषी आढावा बैठकीचे शुक्रवारी (ता. १४) आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंत्री भुसे बोलत होते. कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे, फलोत्पादन संचालक श्री. जमधडे, प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे या वेळी उपस्थित होते. 

श्री. भुसे म्हणाले, की शेतकऱ्यांच्या अपेक्षांची पूर्ती व्हावी आणि कर्मचाऱ्यांच्या कामात गती यावी, यासाठी डिजिटलायझेशनवर भर देण्यात येईल. कृषी विभागाच्या प्रगतीचा आलेख उंचावत असला तरी दुसरीकडे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत ही गंभीर बाब आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सामूहिकरीत्या काम करावे.

या वेळी श्री. डवले म्हणाले, की पीक उत्पादकता वाढीसोबत शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. कृषी विभागातील कार्यरत घटकांनी स्वतःच्या शेतात प्रयोग राबवून गाव व परिसरातील शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरेल असे काम करून दाखवावे.

कृषी आयुक्त श्री. दिवसे म्हणाले, की नव्या तयार होणाऱ्या आकृतिबंधात कामकाजाची गुणवत्ता सुधारताना स्पेशलायझेशनवर भर दिला जाईल. त्यात कामांच्या जबाबदाऱ्या निश्चित करताना कृषी अर्थशास्त्र केंद्रित काम करण्याच्या विभागाला सूचना केल्या आहेत. या वेळी प्रयोगशील शेतकरी व उत्कृष्ट काम करणाऱ्या कृषी कर्मचाऱ्यांचा सन्मान कृषिमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. 

ग्रामविकासासारखे मॉडेल राबवा
ग्रामविकासासारखे कृषी विकासाचे मॉडेल विकसित करून कृषी व संलग्न विभाग एकाच छताखाली जिल्हा व तालुका स्तरावर एकत्रित आणून शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा देणे सोईस्कर होईल, अशी सूचना या वेळी कृषी अधिकऱ्यांनी मांडली.
 


इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीची पहिली यादी आज होणार जाहीर :...मुंबई : आमचे सरकार हे केवळ घोषणा करणारे नाही तर...
राज्यात गोंधळलेले सरकार: देवेेंद्र...मुंबई ः दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत...
कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारची...मुंबई : आजपासून (ता. २४) सुरू होणारे अर्थसंकल्पी...
अकरा लाख टन रिफाइंड पामतेल आयातीला...नवी दिल्ली: केंद्र सरकारने रिफाइंड पामतेलाची...
कर्जमाफी बिनकामाची, तकलादू : राजू...नगर: पंतप्रधान पीकविमा योजना सरकारी...
पूर्व विदर्भात पावसाचा अंदाजपुणे  : पावसासाठी पोषक हवामान असल्याने पूर्व...
‘ठिबक’च्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढपुणे ः ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन...
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...