Farming Agricultural News Marathi Sharad pawar speaks about central government Package Mumbai Maharashtra | Agrowon

शेतीला पुरेसे पॅकेज मिळालेले नाही : शरद पवार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 मार्च 2020

सरकारने मोफत धान्य देण्याचा जो निर्णय घेतला त्याचे स्वागत आहे. परंतु त्याच्या परिणामांचा विचार करायला हवा होता. याचा परिणाम शेती अर्थव्यवस्थेवर होणार आहे, याची दखलही सरकारने घ्यावी.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस.

मुंबई : ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्र्वभूमीवर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने काही निर्णय घेतले आहेत. त्यात शेतीला पुरेसे पॅकेज मिळालेले नाही. पीक कर्जाची परतफेड करणे आता सोपे जाणार नाही. त्यामुळे सरकारने त्याचे हप्ते पाडून दिले पाहिजेत, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. राज्यातही ‘कोरोना’चा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (ता.२७) समाजमाध्यमांवरुन जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील विविध क्षेत्रांसाठी केलेल्या उपाययोजना व आर्थिक तरतुदींवर समाधान व्यक्त केले. मात्र, कृषी क्षेत्रासाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद ही तोकडी असल्याचेही मत व्यक्त केले आहे.

याबाबत श्री. पवार म्हणाले, की ‘कोरोना’शी लढण्यासाठी सर्वांनी एकत्र लढा देण्याची गरज आहे. नागरिकांनी सरकारच्या सूचनांचे पालन करावे. मानव, पशू-पक्षी, पीक-पाणी यांच्यावरही ‘कोरोना’चा परिणाम झाला आहे. राज्याने अनेक दुष्काळ, भूकंप, महापूर परतवून लावले आहेत, त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र, योग्य ती खबरदारी राखून काळजी घेणे गरजेचे आहे. ‘कोरोना’चा छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायांवर मोठा परिणाम होणार आहे. मात्र, अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम हा दीर्घकाळ असेल. अर्थ मंत्रालय आणि रिझर्व बँकेने काही पावले टाकली आहेत. सरकारने शेतीसाठी अद्याप पॅकेज दिलेले नाही.

शेतीच्या दृष्टीने काही करायला हवे असे सांगतानाच जे पॅकेज दिले ते शेतीच्या दृष्टीने पुरेसे आहे असे मला वाटत नाही. शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे. या अवस्थेत त्याची परतफेड करणे शक्य नाही. याचे कारण अनेक पिके आज शेतात आहेत. मात्र या पिकांच्या अनुषंगाने आवश्यक यंत्रणा नाही. लोकं नाहीत, बाजारपेठा नाही, शेतकऱ्यांसमोर हे अतिशय गंभीर प्रश्न आहेत. ही स्थिती शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम करणारी आहे.

या कामासाठी जी गुंतवणूक केली, कर्ज काढले त्या कर्जाला आता चार - पाच वर्षे पीक कर्जाचे हप्ते देण्याची गरज आहे व पहिल्या वर्षात हप्ते वसुली करता कामा नये. त्यांना व्याजात सूट द्यावी. रक्कम परत करण्याची क्षमता राहिली नाही म्हणून त्यांना थकबाकीदार म्हणून नवीन कर्ज मिळायचा मार्ग थांबवता कामा नये आणि त्यांचे खाते ‘एनपीए’मध्ये जाता कामा नये. कापूस पीक धोक्यात आले असून खरेदीही थांबली आहे. कापूस उत्पादक संकटात सापडले आहेत. त्यामुळे त्यांना मदत करण्याची गरज आहे. तसेच असंघटित कामगारांच्या प्रपंचावर देखील परिणाम होत असून या घटकांचाही विचार व्हावा, असेही श्री. पवार यांनी सांगितले.
 


इतर ताज्या घडामोडी
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...
अकोला जिल्हा परिषदेचा ७६ कोटींचा निधी...अकोला  ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या...
हिंगोली जिल्ह्यात ५९ कोटींचे पीककर्ज...हिंगोली   ः हिंगोली जिल्ह्यातील विविध...
कापूस, सोयाबीन उत्पादक विमा...गडचिरोली: धान उत्पादक ३४ हजार शेतकऱ्यांना सुमारे...
नांदेडमध्ये ४७ कोटी ४७ लाखांचे पीक कर्ज...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बॅंकांनी...
जालन्यात पाच हजार टन खते एकाच दिवशी...जालना  : जिल्ह्यात एकाच दिवशी पाच हजार...
कर्जमुक्‍ती योजनेची प्रक्रिया ३०...भंडारा ः शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव...
जयपूरमध्ये वीज पडून लाखो रुपयांच्या...नाशिक : पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर बागलाण...
बुलडाणा जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत...बुलडाणा  : यंदा जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस...
भाजीपाल्याची थेट खरेदी विक्री व्यवस्था...पुणे ः कोरोना टाळेबंदीमध्ये शहरातील विविध भागात...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीसातारा ः जिल्ह्यात सोमवारी सर्वदूर पावसाने हजेरी...
कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा रास्तारोकोयवतमाळ ः महागाव तालुक्‍यातील गुंज येथील...
पुणे जिल्ह्यात पीककर्ज वितरणात...पुणे ः लाॅकडाऊनच्या काळात होरपळून निघालेल्या...
किरकोळ आजारांकडे नको दूर्लक्षमहिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर...