जत तालुक्यात पाण्याअभावी ज्वारीचे पीक वाळू लागले

जत तालुक्यात पाण्याअभावी ज्वारी वाळू लागली आहे
जत तालुक्यात पाण्याअभावी ज्वारी वाळू लागली आहे

सांगली  ः जत तालुक्यात परतीचा पाऊस झाल्याने ज्वारीची पेरणी झाली. ज्वारीची वाढ चांगली झाली. मात्र, आता तालुक्याच्या पूर्व भागात पाण्याअभावी ज्वारीचे पिक वाळू लागले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. 

जत तालुक्यात परतीच्या आणि मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीची पेरणी केली. पिकाला पाण्याची कमतरता पडणार नसल्याने तालुक्यात ज्वारीच्या क्षेत्रात वाढ झाली. रब्बी हंगामातील ज्वारीचे सरासरी क्षेत्र ८० हजार ६८३ हेक्टर असून ७६ हजार ६४९ हेक्टरवर पेरा झाला. वास्तविक पाहता जत तालुक्याच्या पूर्व भागात पाणी टंचाई भासण्यास सुरुवात झाली आहे. जलस्त्रोतांमधील पाणी पातळी खालावू लागली आहे. त्याचा परिणाम ज्वारी पिकावर होऊ लागला आहे. पाण्याअभावी पिके वाळू लागली आहेत.

गेल्यावर्षी तालुक्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप हंगाम वाया गेला. पिकातून हाती काहीच मिळाले नाही. त्यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागला. यंदाही पावसाला उशीरा प्रारंभ झाला. वास्तविक पाहता जत तालुक्यात परतीचा पाऊस होतो. पंरतू हा पाऊस उशीरा झाला. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी पुढाकार घेतला. त्यानंतर मॉन्सूनोत्तर पावसाने जत तालुक्याला झोडपून काढले. मात्र, तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक ठिकाणी पाऊस पडला नाही.

या पावसामुळे डाळिंब आणि द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान होते. त्यामुळे यंदा पीक चांगले बहरणार, आणि उत्पादनही चांगले मिळणार अशी आशा होती. पेरणी झालेल्या पिकांची वाढही चांगली झाली. परंतु, ज्वारी पोटऱ्यात असतानाच पाण्याची कमतरता भासू लागली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com