नगर जिल्ह्यातील कारखान्यांकडून पावणेसात लाख टन ऊस गाळप

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यात १४ सहकारी व नऊ खासगी असे एकूण २३ कारखाने आहेत. त्यातील तेराच कारखान्यांच्या गाळपास सुरवात झाली आहे. आजअखेर पावणेसात लाख टन उसाचे गाळप झाले आहे.

हंगाम सुरू केलेल्या कारखान्यांमध्ये १० सहकारी व तीन खासगी आहेत. केदारेश्‍वर सहकारी साखर कारखाना सुरू झाला होता. मात्र, तांत्रिक अडचणी आल्याने हा कारखाना बंद झाला. जिल्ह्यातील १३ कारखान्यांनी सहा लाख ७४ हजार १४१ उसाचे गाळप केले आहे. यामध्ये तीन लाख ७० हजार ६४६ टन उसाचे सहकारी कारखान्यांनी, तर तीन लाख तीन हजार ४९५ टन उसाचे खासगी कारखान्यांनी गाळप केले आहे. यामध्ये अंबालिका कारखान्याने ऊस गाळपामध्ये आघाडी घेतली आहे. तेथे एक लाख ८२ हजार ८७० टन उसाचे गाळप झाले आहे. दुसऱ्या स्थानी गंगामाई कारखाना आहे. गंगामाईने एक लाख सहा हजार ४५० टन उसाचे गाळप केले आहे.

हे आहेत बंद कारखाने  गणेश, तनपुरे, कुकडी, श्रीगोंदे या सहकारी कारखान्यांबरोबरच पीयूष शुगर, साईकृपा एक, साईकृपा दोन, प्रसाद शुगर, जय श्रीराम शुगर हे पाच खासगी सहकारी कारखाने बंद आहेत. जिल्ह्यातील १३ कारखान्यांनी आजअखेर पाच लाख १९ हजार ३० साखर पोत्यांची निर्मिती केली.

उताऱ्यात काळे कारखाना अव्वल साखर उताऱ्यामध्ये शंकरराव काळे कारखाना अव्वल स्थानी आहे. काळे कारखान्याचा ९.२७ टक्के साखर उतारा निघाला असून, जिल्ह्यात एक नंबर उतारा ठरला आहे. क्रांती शुगर कारखान्याचा ८.३१ टक्के उतारा निघालेला असून, जिल्ह्यात दुसरे स्थान मिळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com