घोडगंगा साखर कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर

पुणेः न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या (२०२०-२१) गळीत हंगामासाठी ऊस लागवड धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या ऊस जातींच्या लागवडीवर भर द्यावा, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार अशोक पवार यांनी दिली.
घोडगंगा साखर कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर
घोडगंगा साखर कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर

पुणे ः न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या (२०२०-२१) गळीत हंगामासाठी ऊस लागवड धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या ऊस जातींच्या लागवडीवर भर द्यावा, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार अशोक पवार यांनी दिली.

आडसाली ऊस लागवडीसाठी को २६५ करिता लागवडीचा कालावधी १५ जून ते ३१ ऑगस्ट २०२० आहे. को - ८६०३२ साठी आडसाली ऊस लागवड कालावधी १ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२० आहे. को -८६०३२, व्हीएसआय -०८००५, व्हीएसआय- ९८०५, को एम - ०२६५, एमएस - १०००१, कोसी-६७१ या ऊस प्रजातींसाठी पूर्व हंगामी लागवड कालावधी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर असणार आहे. त्याचप्रमाणे सुरू ऊस लागवडीचा कालावधी १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी २०२१ असा आहे. या कालावधीत को- ८६०३२, कोसी ६७१, व्हीएसआय - ०८००५, व्हीएसआय - ९८०५, व्हीएसआय - ४३४ व एमएस १०००१ या ऊस प्रजातींची लागवड शेतकरी करू शकतात.

आगामी काळात ठिबक सिंचनावर लागवड केलेल्या उसाची प्राधान्याने तोडणी करण्यात येणार आहे. तसेच ऊस तोडणी कार्यक्रम राबवताना उसाची रिकव्हरी तपासून जादा साखर उतारा असणाऱ्या उसाला प्राधान्याने तोड देण्यात येईल.

ज्या शेतकऱ्यांना उसाची लागवड रोपांपासून करावयाची आहे. अशा शेतकऱ्यांनी ऊस लागवड धोरणाच्या पुढे तीस दिवसानंतर शेतात ऊस रोपांची लागवड करावी व त्याच दिवशी ऊस लागवड नोंद करावी. ऊस उत्पादकांनी माती परीक्षण करून घेऊन शिफारशीनुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासदांना प्रेसमडवर जैविक प्रक्रिया केलेले सेंद्रिय खत योग्य दरात दिले जाईल, अशी माहिती श्री. पवार यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com