Farming Agricultural News Marathi Sunanda Bhagvat gives support to hundreds of girls Nagar Maharashtra | Agrowon

सुनंदाताई भागवत बनल्यात शेकडो मुलींचा आधार

सुर्यकांत नेटके
रविवार, 8 मार्च 2020

नगर ः त्यांच्या घरची परिस्थिती सर्वसामान्य. मात्र, सामाजिक कामात त्यांनी स्वतःला वाहून घेतले आणि जेमतेम पहिली शिकलेल्या  सुनंदाताई भागवत संगमनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेकडो मुलींसाठी आधार बनल्या. दुष्काळग्रस्त भागात शाळा, मुलींचे वसतिगृह  सुरू करून या माध्यमातून आत्तापर्यंत त्यांनी चारशेपेक्षा अधिक मुलींना स्वखर्चाने शिकवून स्वयंपूर्ण केले आहे. बारा अनाथ मुलींचा सांभाळ करून स्वखर्चाने विवाह करून दिले आहेत.

नगर ः त्यांच्या घरची परिस्थिती सर्वसामान्य. मात्र, सामाजिक कामात त्यांनी स्वतःला वाहून घेतले आणि जेमतेम पहिली शिकलेल्या  सुनंदाताई भागवत संगमनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेकडो मुलींसाठी आधार बनल्या. दुष्काळग्रस्त भागात शाळा, मुलींचे वसतिगृह  सुरू करून या माध्यमातून आत्तापर्यंत त्यांनी चारशेपेक्षा अधिक मुलींना स्वखर्चाने शिकवून स्वयंपूर्ण केले आहे. बारा अनाथ मुलींचा सांभाळ करून स्वखर्चाने विवाह करून दिले आहेत. विशेष म्हणजे, सामाजिक कामाच्या जोरावर जिल्हा परिषद सदस्य, पाणी संस्थेच्या अध्यक्ष आणि सरपंचपद भूषविणाऱ्या सुनंदाताई वयाच्या ६५व्या वर्षी  पदवीधर झाल्या असून, महिला आणि तरुणींसाठी आदर्श ठरल्या आहेत.   

संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ सारख्या दुर्गम भागात वयाची सत्तरी ओलांडलेल्या सुनंदाताई गहिनाजी भागवत यांचे काम गावो गावी चर्चिले जात आहे. नांदुर खंदरमाळच्या बिनविरोध सरपंच असलेल्या सुनंदाताई यांचा जन्म १९४८ मध्ये पुणे जिल्ह्यातल्या बोरी शिरोली (ता. जुन्नर) येथे झाला. जन्म जरी बोरी शिरोली येथे झाला असला तरी, वडिलांच्या नोकरीमुळे बालपण मुंबईत गेले. शाळेत पहिलीतला प्रवेशही मुंबईतच. मात्र एक दिवस शेजारी राहणारी एक मुलगी बेपत्ता झाल्याने, त्यांच्या बालमनावर भीतीचा पगडा बसला,  त्यात घाबरलेल्या आई-वडिलांनी त्यांची शाळा बंद केली ती कायमचीच. मात्र शाळा शिकल्या नसल्या तरी त्यांना आईने पक्की अक्षर ओळख करून दिली.

साठ वर्षांपूर्वीच्या काळात बालविवाह सर्वमान्य होते, तत्कालीन रुढीप्रमाणे वयाच्या १२ वर्षी नांदूर खंदरमाळच्या गहिनाजी भागवत यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. पती मुंबईत नोकरीला असल्याने, माहेर, सासर मुंबईतच. मात्र १९७५ मध्ये भागवत दांपत्य नांदुर खंदरमाळला  परतले. गावी आल्यानंतर सुनंदाताईंनी सामाजिक कामांत झोकून देत महिला विकासासाठी काम करण्याला सुरुवात केली.

गावातील १५० महिलांना एकत्र करून मदतीने जिल्ह्यातील पहिली महिलांद्वारे संचलित केली जाणारी पाणी पुरवठा योजना सुरू केली. गावातील मुलांसोबत मुलींनाही माध्यमिक शिक्षणासाठी दूर जावे लागत असल्याने १३ जून १९८९ मध्ये त्यांनी महिलांच्या मदतीने नांदुर खंदरमाळ येथे भगवती माता विद्यालय या शाळेची स्थापना केली. १३ जून १९९० मध्ये मुलींच्या शिक्षणाच्या सोईसाठी स्वतःची जमीन दान देऊन वसतिगृह सुरू केले. त्यात अनाथ, गरीब कुटुंबातील मुलींना प्रवेश देऊन त्यांचे संपूर्ण शिक्षण स्वखर्चाने व लोकवर्गणीतून करून देऊ लागल्या. आत्तापर्यंत वसतिगृहातून ४०० पेक्षा अधिक अनाथ, गरीब कुटुंबांतील मुलींना स्वयंपूर्ण केले आहे. बारा अनाथ मुलींचे स्वखर्चाने विवाह लावून दिले आहेत. त्यांनी शिकवलेल्या अनेक मुली उच्च शिक्षित होऊन नोकरी, व्यवसायात स्थिरावल्या आहेत.

सध्या त्यांच्या वसतिगृहात ४३  मुली शिकतात. शासनाकडून प्रतिदिन ३० रुपयांप्रमाणे ३० मुलींसाठी भत्ता मिळतो. उर्वरित सर्व खर्च त्या स्वतः करतात. मुलींच्या शिक्षण, वसतिगृहात अधिकचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी पंधरा वर्षांपासून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे. देणगीदारांचीही त्यांना मदत होते. 

लोकांनीच दिला पदाचा सन्मान
सुनंदाताई भागवत १९९२ ते १९९७ या काळात साकुर गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेल्या. १९९४ ते २००० या काळात त्यांनी दोन वेळा सहकारी सेवा संस्थेची पहिली महिला अध्यक्ष  होण्याचा मान मिळवला. आता गावाने त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना २०१४ पासून गावच्या सरपंचपदावर बिनविरोध विराजमान केलेय. गाव पातळीवर पदासाठी संघर्ष करावा लागतो. सुनंदाताई यांनी समाजात केलेल्या कामांमुळे लोकांनीच त्यांना पदाचा सन्मान दिलाय. 

...अन् सुनंदाताई पदवीधर झाल्या
अनेक वर्षे मुंबईत राहूनही शिक्षण घेता आले नाही, यांची त्यांना कायम खंत असायची. अवघे पहिलीपर्यंत शिक्षण झालेल्या सुनंदाताई वयाच्या ६४व्या वर्षी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेऊन जिद्दीने बीएची पदवी मिळवत पदवीधर झाल्या. त्यांच्या समाजकार्याची दखल घेत त्यांचा राज्य शासनाचा सावित्रीबाई फुले, जिजामाता कृषिभूषण, वीरांगना सावित्रीबाई  फुले, तर नेपाळ देशाने रमाबाई आंबेडकर पुरस्काराने गौरव केला आहे. 


इतर महिला
पूरक उद्योगातून मिळाली आर्थिक साथपरभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावातील झाडे...
आरोग्यदायी फणसवरून काटेरी पण आतून गोड.. असे म्हटले की फणस हे फळ...
गटामुळे मिळाली शेती, पूरक उद्योगाला...  टाकळीमिया (ता. राहुरी, जि. नगर) येथील...
अजीर्ण, अपचनावर गुणकारी बडीशेपकोणताही सण, समारंभ आणि घरगुती कार्यक्रमाच्या...
नाचणी प्रक्रियेतून मिळवली आर्थिक समृद्धीकोकणात भातशेतीबरोबर नाचणीची लागवड मोठ्या प्रमाणात...
गुणकारी कोकमकोकम सरबतामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते....
महौषधी जिरेस्वयंपाकात, पदार्थात, मसाल्यात उपयुक्त असणारे...
किरकोळ आजारांकडे नको दूर्लक्षमहिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर...
आरोग्यदायी ज्येष्ठमधसमस्त महिलावर्गासाठी ज्येष्ठमध काही नवीन नाही....
कुक्कुटपालन, परसबागेने दिली आर्थिक साथचिंचघरी (ता.चिपळूण,जि.रत्नागिरी) येथील अंजली...
महिलांमध्ये तयार झाली स्वयंरोजगाराची ‘...ग्रामीण भागातील महिलांना छोट्या उद्योगातून रोजगार...
आरोग्यदायी कलिंगडकलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून...
शेतीमधील ‘विमेन चॅम्पियन'पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि नाशिक जिल्ह्यातील...
आरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...
औषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत....
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...
वाढवा प्रतिकार क्षमतासध्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे....
मुलींना मिळाली जिल्हाधिकारी, पोलिस...बुलडाणा  ः राज्यात जागतिक महिला दिनानिमित्त...
सुनंदाताई भागवत बनल्यात शेकडो मुलींचा...नगर ः त्यांच्या घरची परिस्थिती सर्वसामान्य. मात्र...
राज्यातील चौदा टक्के शेतीक्षेत्राची ‘ती...पुणे: एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रांत महिलांचा...