Farming Agricultural News Marathi Tur producers waiting for payment Nagar Maharashtra | Page 2 ||| Agrowon

तूर विक्रीपोटी शेतकऱ्यांचे पावणेदोनशे कोटी रुपये अडकले

सूर्यकांत नेटके
गुरुवार, 21 मे 2020

खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने तूर विक्री केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पैसे मिळण्याची व्यवस्था करावी. शेतकरी आर्थिक अडचणीत असून पैसे थकवून शेतकऱ्यांना अजून अडचणीत आणू नये. याबाबत मार्केटींग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांशी बोलणार आहे.
- बाळासाहेब पटारे, विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना.

नगर ः शासकीय हमीभाव केंद्रांवर तूर विक्री केलेल्या राज्यातील शेतकऱ्यांचे पावणेदोनशे कोटींपेक्षा अधिक रुपये अडकले आहेत. नाफेड व भारतीय अन्न महामंडळामार्फत आतापर्यंत सात लाख ५३ हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे. खरिपाच्या तोंडावर तातडीने पैसे मिळाले नाही तर शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.

शेतकऱ्यांकडील तूर, हरभऱ्याची खरेदी करण्यासाठी शासनाने नाफेडमार्फत हमीभावाने खरेदी केंद्रे सुरु केली आहेत. सध्या भारतीय अन्न महामंडळामार्फत सोलापूर, चंद्रपूर, उस्मानाबाद, वर्धा, बीड या पाच जिल्ह्यांतील ४१ केंद्रांवर तूर खरेदी सुरु आहे. तसेच राज्यात मार्केटिंग फेडरेशनमार्फत नाफेड तर्फे १५७ केंद्रांवर तुरीची ५ हजार ८०० रुपये क्विंटल या हमीभावाने खरेदी सुरु आहे. खरेदीनंतर साधारण आठ ते पंधरा दिवसांत पैसे मिळणे गरजेचे असताना वेळेवर पैसै मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

आतापर्यंत केंद्रांवर खरेदी केलेल्या सात लाख ५३ हजार क्विंटल तुरीपैकी चाळीस टक्के म्हणजे तीन लाख क्विंटल तुरीचे पैसे येणे बाकी आहे. आतापर्यंत २५० कोटी वितरित केले असून अजून साधारण १७५ कोटींचे वितरण रखडले आहे. नगर जिल्ह्याचा विचार करता आतापर्यंत ११ हजार ४०४ शेतकऱ्यांकडून ७० हजार ६०५ क्विंटल तूर खरेदी झालेली आहे. त्यापैकी ४९ हजार ९७२ क्विंटल तुरीचे २८ कोटी ९८ लाख ३७ हजार ६०० रुपये वितरित केले असले तरी अजून १२ कोटी रुपये रखडले आहेत.

खरीप हंगाम वीस दिवसांवर आला आहे. त्याआधी खते, बियाणे व अन्य बाबींची खरेदी केली जाते. शेती मशागतीची कामे याच पैशांवर होतात. त्यामुळे तूर विक्रीचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत तर खरिपावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, तुरीचे राहिलेले पैसै तातडीने शेतकऱ्यांना देण्याबाबत नाफेडकडून प्रक्रिया सुरु आहे. चार दिवसांत बहुतांश शेतकऱ्यांना पैसे वितरित होतील असे मार्केटींग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
 


इतर अॅग्रो विशेष
Breaking : मॉन्सून एक्सप्रेस केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
मॉन्सून आज केरळात येण्याचे संकेतपुणे  : अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांलगत...
कोकणात मुसळधार पावसाचा इशारापुणे  : अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे...
आठवडाभरापासून टोळधाड विदर्भातचनागपूर   ः गेल्या आठवडाभरापासून...
परभणीतील खरेदी केंद्रावर कापूस विक्रीत...परभणी  ः राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
चाकणच्या जनावरे बाजारात एक कोटींची...पुणे  ः गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून ‘...
भाजीपाला लागवडीतून उघडला प्रगतीचा मार्गसोयाबीन, भात अशा पारंपरिक कोरडवाहू पिकांवर भिस्त...
सक्रिय रुग्णांची संख्या घटली; एका...नवी दिल्ली : कोरोना महामारीविरूद्धच्या...
विदर्भात टोळधाडीची अस्तित्व कायमनागपूर : कृषी विभागाकडून टोळधाड नियंत्रणासाठी...
राज्यातील भाजीपाला लागवड खोळंबली कोल्हापूर: सध्याच्या स्थितीत भाजीपाल्याचे...
राज्यात देशी कोंबडी पिलांना मागणी वाढली नगर ः काही महिन्यांपूर्वी कोरोना आणि चिकनबाबत...
शेतकऱ्यांची खत विक्री दरात फसवणूक करू...बुलडाणा ः या खरीप हंगामात शेतकऱ्यांना रास्त...
राज्यात बेदाण्याचे सव्वा दोन लाख टन...सांगली : यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर ‘कोरोना...
मॉन्सूनची आणखी प्रगती शक्यपुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल...