Farming Agricultural News Marathi Two special labor trains leave from Nashik Maharashtra | Agrowon

नाशिकमधून मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशसाठी दोन विशेष श्रमिक रेल्वे रवाना

टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 मे 2020

नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने दळणवळणच्या सुविधा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अनेक परप्रांतीय नागरिक गावाच्या दिशेने पायी निघाले होते. त्यांना नाशिकमध्ये अडवून निवारा गृहांमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यानंतर मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश मधील जवळपास १२०० च्या आसपास आसलेल्या नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या करून त्यांना भोपाळ व लखनऊसाठी दोन विशेष श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून रवाना करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून सोडलेल्या या पहिल्या रेल्वे आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (ता.२) सकाळी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला.

नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने दळणवळणच्या सुविधा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अनेक परप्रांतीय नागरिक गावाच्या दिशेने पायी निघाले होते. त्यांना नाशिकमध्ये अडवून निवारा गृहांमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यानंतर मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश मधील जवळपास १२०० च्या आसपास आसलेल्या नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या करून त्यांना भोपाळ व लखनऊसाठी दोन विशेष श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून रवाना करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून सोडलेल्या या पहिल्या रेल्वे आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (ता.२) सकाळी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला.

नाशिकमधील निवारागृहामध्ये परप्रांतीय कामगारांना ठेवण्यात आले होते. त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या करून मध्य प्रदेशातील कामगारांना घेऊन एक गाडी शुक्रवारी (ता.१) रात्री साडे नऊ वाजता रवाना झाली होती. त्यातून ३३९ नागरिकांना पाठवण्यात आले होते. त्यानंतर उत्तरप्रदेशातील नागरिकांना घेऊन शनिवारी (ता.२) विशेष रेल्वे गाडी सकाळी साडे दहा वाजता लखनऊच्या दिशेने रवाना करण्यात आली. यामध्ये ८३९ नागरिक सोडण्यात आले आहेत.

सकाळी गावी जाण्यासाठी नोंदणी केलेल्या सर्व मजूर व कामगारांना विशेष बसने नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. रेल्वे गाडीची निर्जंतूक प्रक्रिया केल्यानंतर प्रवाशांना गाडीत बसवून सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे,पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आदी उपस्थित होते.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन १७ मे पर्यंत वाढला आहे. या अडचणीमुळे परराज्यातून महाराष्ट्रात आलेल्या मजुरांची मोठी गैरसोय होत होती. ती टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रवासादरम्यान भोजन,पाणी व खबरदारी साठी मास्क या सर्व सुविधा त्यांना देण्यात येणार आहेत. प्रवासादरम्यान गोंधळ होणार नाही,याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...