Farming Agricultural News Marathi two thousand crores required for gosekhurda dam project Bhandara Maharashtra | Agrowon

गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दरवर्षी दोन हजार कोटींची गरज 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

भंडारा   : गोसेखुर्द प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण करण्याकरिता प्रतिवर्षी दोन हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामकाजाचा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी आढावा घेतला. यावेळी ही माहिती देण्यात आली. गोसेखुर्द प्रकल्पाच्या पुनर्वसनाला गती देण्याची सूचना मंत्री केदार यांनी यावेळी केली. 

भंडारा   : गोसेखुर्द प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण करण्याकरिता प्रतिवर्षी दोन हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामकाजाचा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी आढावा घेतला. यावेळी ही माहिती देण्यात आली. गोसेखुर्द प्रकल्पाच्या पुनर्वसनाला गती देण्याची सूचना मंत्री केदार यांनी यावेळी केली. 

वाही येथील विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत मंत्री केदार बोलत होते. भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, गोसेखुर्द उपसा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता जगत टाले, गोसेखुर्द धरण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश शर्मा, गोसेखुर्द डावा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता सुहास मोरे, गोसेखुर्द उपसा सिंचन विभाग, अंबाडीचे कार्यकारी अभियंता अनिल फरकाडे, नागपूर येथील गोसेखुर्द पुनर्वसन विभागाचे कार्यकारी अभियंता विजयश्री बुराडे व यांत्रिक विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. वऱ्हाडे व माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे यावेळी उपस्थित होते. 

गोसेखुर्द प्रकल्पाची सुधारित प्रशासकीय मान्यता १८ हजार ४९४ कोटींची आहे. प्रकल्पाची एकूण पाणीसाठा क्षमता ११४६ दलघमी आहे. गोसेखुर्दची सिंचन क्षमता २ लाख ५० हजार ८०० हेक्टर असून या हंगामात १ लाख १४ हजार ४५१ हेक्टर सिंचन झाल्याची माहिती श्री. टाले यांनी दिली. गोसे धरण येथे खासगीकरणांतर्गत दोन जल विद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत. गोसे खुर्दच्या डाव्या कालव्याची लांबी २३ किमी असून कालव्याचे काम पूर्ण झाले आहे, असे यावेळी सांगण्यात आले. 
गोसेखुर्द अंतर्गत येणाऱ्या उपसा सिंचन योजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

नेरला उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाली असून २८ हजार ६८० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या उपसा सिंचन योजनेतून मार्च अखेर १० हजार ६१२ हेक्टर सिंचन झाले आहे. करजखेडा, सुरेवाडा, धारगाव टप्पा एक व दोन आदी योजनांचाही आढावा यावेळी घेण्यात आला. गोसेखुर्द प्रकल्पाच्या पुनर्वसनाचे काम गतीने करावे, असे मंत्री केदार यांनी सांगितले. पावसाळी पर्यटनाच्या दृष्टीने गोसेखुर्द धरण परिसराचा विकास करण्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. लवकरच मुंबईत या विषयावर पर्यटन व जलसंधारण विभागाची बैठक बोलविण्यात येईल असे श्री. केदार म्हणाले. बैठकीनंतर श्री. केदार यांनी गोसेखुर्द धरणाची पाहणी केली. 


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सततच्या पावसाने मुगाचे...नगर  ः नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून...
नांदेड जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरवर...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणी...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी पट्टा...पुणे  ः चालू वर्षी खरीप हंगामात ड्रम सीडर...
दोंडाईचा मालधक्क्यावर अधिकाऱ्यांच्या...धुळे ः युरिया वितरणातील घोळ, शेतकऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यात फळबाग लागवड वाढण्याचा...नगर  ः यंदा पाऊस चांगला, शिवाय मागील काही...
कोल्हापुरात अर्धा टक्के शेतकऱ्यांनी ...कोल्हापूर : राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेला...
रत्नागिरी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाची...रत्नागिरी  ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
अकोला जिल्ह्यातील दोन लाखांवर ...अकोला  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
नागपूर कृषी महाविद्यालय राबवणार ‘ई-...नागपूर  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन...
उभ्या पिकात मूलस्थानी जलसंवर्धनकोरडवाहू शेतीमध्ये जमिनीतील पाण्याची कमतरता पाहता...
दूध प्रश्न बाजूला; शेतकरी संघटनांमधील...कोल्हापूर  : दूध दरप्रश्नी सरकारवर दबाव...
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
घरोघरी असावी पोषण परसबागपरसबागेचा आकार हा जागेची उपलब्धता, कुटुंबातील...
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक;...मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या...
अपचन, खोकला, कफावर गुणकारी पिंपळी पावडर आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना पिंपळी नक्कीच...
मागण्यांसाठी मराठवाड्यात दूध...औरंगाबाद : दूध उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा...
नैसर्गिकरीत्या वाढवा रोगप्रतिकारक शक्तीरोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश...
परभणी जिल्ह्यात रास्ता रोको, दूध संकलन...परभणी : दूध दरवाढीसाठी भाजपतर्फे शनिवारी (ता.१)...
दूध दरप्रश्नी आंदोलनाला विदर्भात...नागपूर : दूध दरप्रश्नी भाजपच्या वतीने...
दूध दरप्रश्नी भाजपचे सातारा जिल्ह्यात...सातारा  : गाईच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये...