नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यात प्रतिकूल हवामानाचा तूर पिकावर परिणाम
प्रतिकूल हवामान आणि पावसामुळे तुरीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादन कमी होईल. या पिकासाठी केलेला खर्च मिळणे कठीण आहे.
- रामचंद्र धोंडाप्पा पुजारी, दरीबडची, ता. जत, जि. सांगली.
सांगली : जिल्ह्यात पोषक हवामानाअभावी तूर पिकाची वाढ खुंटली. पाण्याची कमतरता आणि बदलत्या हवामानामुळे काही ठिकाणी फूलगळ झाली आहे. परिणामी, तूर उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
दुष्काळग्रस्त पट्ट्यातील हुकमी पीक म्हणून शेतकरी तूर लागवडीकडे वळाले आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांत कमी पाऊस झाल्याने कवठेमहांकाळ, आटपाडी, तालुक्यात तुरीचा पेरा कमी झाला. यंदा खरिपात लागवड केलेल्या परंतु चांगल्या स्थितीत असलेल्या तुरी पिकाची येत्या आठ ते दहा दिवसांत काढणी केली जाईल. त्यादृष्टीने शेतकरी नियोजन करू लागले आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात पहिल्या पावसावर जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी तुरीची लागवड केली. या पिकाची चांगली उगवण झाली. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाले होते. तसेच अनेक शेतकऱ्यांनी तुरीची उशिरा पेरणी केली होती. परंतु, पाणीटंचाई असल्याने तूर पिकाची वाढ खुंटली. शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत होते. मात्र, पीकवाढीच्या दरम्यान पाऊस झालाच नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला. त्यानंतर मॉन्सूनोत्तर पावसाने हजेरी लावल्याने पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला.
सुरवातीच्या काळात पाऊस नसल्याने तुरीची अपेक्षित वाढ झाली नाही. फुटवादेखील कमी फुटला. त्यामुळे घातलेला खर्च मिळणे कठीण झाले आहे. गेल्या वर्षी तुरीला दर १० ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटल दर होता. यामुळे मोठ्या अपेक्षेने माळरानावर व खडकात, मध्यम प्रतीच्या जमिनीमध्ये तुरीची लागवड घेतली आहे. पीकवाढीच्या काळात पाण्याची कमतरता आणि प्रतिकूल हवामानामुळे तूर पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
- 1 of 1028
- ››