Farming Agricultural News Marathi urea shortage in district Nagar Maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात युरियाची टंचाई कायम 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

युरिया असूनही कृषी निविष्ठा विक्रेते तो देत नाहीत. त्यासोबत अन्य खते घ्यायला लावतात. त्याबाबत मी कृषी विभागाकडे तक्रार केली. त्यामुळे मला युरिया खत मिळाले. मात्र गरजेच्या वेळीच शेतकऱ्यांना खते मिळत नसल्याची स्थिती आहे. 
- ज्ञानेश्वर गागरे, शेतकरी, वनकुटे, जि. नगर. 

नगर  ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया खताची गरज आहे. हे ओळखून विक्रेत्यांकडून युरियाची टंचाई निर्माण केली जात आहे. युरिया खताच्या गोणीची जादा दराने खरेदी केली जात आहे. तसेच युरियासोबत लिंकिंग करत अन्य खते खरेदी करण्याचा आग्रह देखील केला जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. कृषी विभाग मात्र अलबेल असून विक्रेत्यांना पाठीशी घालत खताची टंचाई नसल्याचा नेहमीप्रमाणे दावा करतेय. युरिया जादा दराने खरेदी करावा लागत असल्याने शेतकरी मात्र हतबल झालेत. 

नगर जिल्ह्यात यंदा आत्तापर्यंत पाच लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. बाजरीचे क्षेत्र सरासरीच्या जवळ, तर मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीनची पेरणी आणि कापसाची लागवड सरासरीच्या क्षेत्रापुढे गेली आहे. सध्या पिके जोमात असून पाऊसही चांगला असल्याने शेतकरी समाधानी आहेत. मात्र सध्या पिकांना युरियाची गरज असताना तो मात्र मिळत नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी उपलब्ध असूनही युरिया दिला जात नाही. काही ठिकाणी जादा किंमत मोजावी लागतेय तर काही ठिकाणी युरियासोबत अन्य खते खरेदी करण्याची सक्ती केली जातेय.

खते, बियाणांचा काळाबाजार होऊ नये म्हणून चौदा तालुक्यांत भरारी पथके नियुक्त केल्याचे कृषी विभाग आणि प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात होते. मात्र प्रत्यक्षात कुठेही कारवाई केलेली दिसत नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारी असतानाही दखल घेतली जात नसेल तर पथके नेमकी करतात काय असा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कृषी विभागाचे अधिकारी खताची चढ्या भावाने विक्री करून अडवणूक करणाऱ्यांनाच पाठीशी घालत असल्याचा आरोप कल्याणकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते गुलाबराव डेरे यांनी केला आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांनी लक्ष घालून नगर जिल्ह्यात युरिया खताबाबत केली जाणारी अडवणूक थांबवावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 
 
इथं कोण स्टिंग आॅपरेशन करणार 
कृषिमंत्री दादा भुसे यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबादेत स्टिंग आॅपरेशन करत युरियाची टंचाई दाखवून शेतकऱ्यांचा लुटत असल्याचा प्रकार उघड केला. त्यामुळे काही दिवसांसाठी का होईना तेथे शेतकऱ्यांना रास्त दरात खत मिळू लागले. नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मात्र युरियाची मागणी पाहून सर्रासपणे लूट सुरू आहे.

कृषी विभागाची भरारी पथके केवळ नावालाच आहेत. शेतकऱ्यांना रास्त दरात आणि वेळेवर खते मिळण्यासाठी कोण स्टींग आॅपरेशन करणार असा प्रश्न विचारला जात आहे. नुकतीच शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे कृषी विभागाच्या भोंगळ कारभाराची तक्रार केली. 
 
 


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सततच्या पावसाने मुगाचे...नगर  ः नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून...
नांदेड जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरवर...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणी...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी पट्टा...पुणे  ः चालू वर्षी खरीप हंगामात ड्रम सीडर...
दोंडाईचा मालधक्क्यावर अधिकाऱ्यांच्या...धुळे ः युरिया वितरणातील घोळ, शेतकऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यात फळबाग लागवड वाढण्याचा...नगर  ः यंदा पाऊस चांगला, शिवाय मागील काही...
कोल्हापुरात अर्धा टक्के शेतकऱ्यांनी ...कोल्हापूर : राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेला...
रत्नागिरी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाची...रत्नागिरी  ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
अकोला जिल्ह्यातील दोन लाखांवर ...अकोला  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
नागपूर कृषी महाविद्यालय राबवणार ‘ई-...नागपूर  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन...
उभ्या पिकात मूलस्थानी जलसंवर्धनकोरडवाहू शेतीमध्ये जमिनीतील पाण्याची कमतरता पाहता...
दूध प्रश्न बाजूला; शेतकरी संघटनांमधील...कोल्हापूर  : दूध दरप्रश्नी सरकारवर दबाव...
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
घरोघरी असावी पोषण परसबागपरसबागेचा आकार हा जागेची उपलब्धता, कुटुंबातील...
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक;...मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या...
अपचन, खोकला, कफावर गुणकारी पिंपळी पावडर आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना पिंपळी नक्कीच...
मागण्यांसाठी मराठवाड्यात दूध...औरंगाबाद : दूध उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा...
नैसर्गिकरीत्या वाढवा रोगप्रतिकारक शक्तीरोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश...
परभणी जिल्ह्यात रास्ता रोको, दूध संकलन...परभणी : दूध दरवाढीसाठी भाजपतर्फे शनिवारी (ता.१)...
दूध दरप्रश्नी आंदोलनाला विदर्भात...नागपूर : दूध दरप्रश्नी भाजपच्या वतीने...
दूध दरप्रश्नी भाजपचे सातारा जिल्ह्यात...सातारा  : गाईच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये...