Farming Agricultural News Marathi vegetable procurement again stop in market committee Nagar Maharashtra | Agrowon

नगर बाजारसमितीत भाजीपाला खरेदी-विक्री पुन्हा बंद

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 मार्च 2020

नगर  ः नगर शहरात भाजीपाला, फळांची मागणी आणि तुटवडा याचा विचार करुन बाजार समितीच्या विनंतीवरुन नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात भाजीपाला, फळे लिलाव करण्याला रविवारी (ता.२९) सायंकाळी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी परवानगी दिली. त्यानुसार सोमवारी (ता.३०) सकाळी बाजार समितीच्या नेप्ती बाजारात भाजीपाला, फळे विकण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. मात्र खरेदीदारांपेक्षा अन्य लोकांची गर्दी अधिक झाली. गर्दी अटोक्यात येत नसल्याने पुन्हा भाजीपाल्याची खरेदी-विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापाऱ्यांनीही लिलाव करण्याबाबत असमर्थता दर्शवली आहे.

नगर  ः नगर शहरात भाजीपाला, फळांची मागणी आणि तुटवडा याचा विचार करुन बाजार समितीच्या विनंतीवरुन नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात भाजीपाला, फळे लिलाव करण्याला रविवारी (ता.२९) सायंकाळी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी परवानगी दिली. त्यानुसार सोमवारी (ता.३०) सकाळी बाजार समितीच्या नेप्ती बाजारात भाजीपाला, फळे विकण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. मात्र खरेदीदारांपेक्षा अन्य लोकांची गर्दी अधिक झाली. गर्दी अटोक्यात येत नसल्याने पुन्हा भाजीपाल्याची खरेदी-विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापाऱ्यांनीही लिलाव करण्याबाबत असमर्थता दर्शवली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आठ दिवसांपासून लाॅकडाऊन सुरु आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. जीवनाश्यक वस्तू असल्याने बाजार समितीत भाजीपाला लिलाव सुरु ठेवण्याचे सरकारचे आदेश आहेत. मात्र भाजीपाला बाजार सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी भाजीपाला खेरदी-विक्री बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. मात्र लोकांची गैरसोय, शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने व्यापारी, हमाल, किरकोळ खरेदीदार आणि शेतकरी यांनाच बाजार समितीत प्रवेश देऊन गर्दी कमी करण्याच्या उपाययोजना करीत सोमवारपासून भाजीपाला लिलाव, खरेदी-विक्री सुरु करण्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली.

नेप्ती उपबाजाराचे अंतर नगर शहरापासून दहा किलोमीटर आहे. येथे सोमवारी सकाळी भाजीपाल्याचे लिलाव सुरु झाले. मात्र चार-पाच व्यापारी वगळता अन्य व्यापारी आले नाहीत. साधारण पंचवीस ते तीस गाड्यांची आवक झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट किरकोळ विक्रेत्यांनी भाजीपाला, फळांची विक्री केली. मात्र शहराबाहेर असूनही किरकोळ खरेदीदारांसह अन्य नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली. ही गर्दी अटोक्यात येत नसल्याने सकाळी सात वाजताच भाजीपाला- फळांची खरेदी-विक्री थांबवली.

उपाययोजना करुनही गर्दीवर नियंत्रण मिळत नाही. नागरिकही सांगून गर्दी करत असल्याने आजपासून (मंगळवार) पु्न्हा जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याशी चर्चा करुन बाजार समितीत भाजीपाला, फळांचे लिलाव बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...