Farming Agricultural News Marathi Vegetable sales will be from grocery stores Latur Maharashtra | Agrowon

लातुरात किराणा दुकानांतून होणार भाजीपाला विक्री 

विकास गाढवे
मंगळवार, 31 मार्च 2020

लातूर : ‘कोरोना’ला रोखण्यासाठी सरकारने लागू केलेल्या संचारबंदीचा जिल्ह्यात पुरता पालापाचोळा झाला आहे. भाजीपाला व फळे विक्री व खरेदीचे कारण पुढे करून नागरिक संचारबंदीतही मुक्त वावर करत आहेत. यामुळेच जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी भाजीपाला व फळे विक्रीला आजपासून (ता. ३१) बंदी घातली असून, आता केवळ किराणा व स्वस्त धान्य दुकानांतून दुपारी दोन वाजेपर्यंतच भाजीपाला व फळ विक्रीला परवानगी दिली आहे. 

लातूर : ‘कोरोना’ला रोखण्यासाठी सरकारने लागू केलेल्या संचारबंदीचा जिल्ह्यात पुरता पालापाचोळा झाला आहे. भाजीपाला व फळे विक्री व खरेदीचे कारण पुढे करून नागरिक संचारबंदीतही मुक्त वावर करत आहेत. यामुळेच जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी भाजीपाला व फळे विक्रीला आजपासून (ता. ३१) बंदी घातली असून, आता केवळ किराणा व स्वस्त धान्य दुकानांतून दुपारी दोन वाजेपर्यंतच भाजीपाला व फळ विक्रीला परवानगी दिली आहे. 
 

‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंना सूट देण्यात आली आहे. याचा आधार घेऊन नागरिक भाजीपाला खरेदीसाठी एकाच ठिकाणी गर्दी करू लागले. त्यांना आवर घालण्यासाठी व सुरक्षित सामाजिक अंतराला प्राधान्य देऊन जिल्हा प्रशासनाने गेल्या आठ दिवसांत विविध उपाययोजना केल्या. यात विविध ठिकाणी जागा आखणी करून देणे, ईदगाह व दयानंद महाविद्यालयाचा परिसर विक्रेत्यांसाठी अधिग्रहीत करणे या उपाययोजनांचा समावेश होता. मात्र, विक्रेते व नागरिकांनी त्या धुळीस मिळवल्याने गर्दी कमी होण्याऐवजी वाढली. भाजीपाला व फळे विक्रीला शिस्त लावण्यात आठ दिवस ७० टक्के उर्जा खर्च करूनही फायदा झाला नाही. यातच रविवारी (ता. २९) जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी शहरात फिरून भाजीपाला व फळे विक्रेत्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांना धक्काच बसला. विक्रेत्यांत अचानक वाढ झाल्याचे त्यांना दिसून आले. काल, परवापर्यंत मजुरी करणारेही भाजीपाला विक्री करत असल्याचे आढळून आले. यामुळेच कोरोना संसर्ग रोखण्याची संचारबंदीची उपाययोजना फुसका बार ठरू लागली होती.

यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असलेली भाजीपाला व फळ विक्री बंद केली असून आता किराणा दुकान व स्वस्त धान्य दुकानांतूनच भाजीपाला व फळ विक्रीला परवानगी दिली आहे. नोंदणीकृत हातगाडा व्यावसायिक तसेच उत्पादक शेतकऱ्यांना रस्त्यावर फिरून भाजीपाला व फळ विक्री करता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यासोबत किराणा दुकान, स्वस्त धान्य दुकान व सुपर मार्केटमधूनही दुपार दोनपर्यंत आणि सुरक्षित सामाजिक अंतर ठेऊन फळे व भाजीपाला विकता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आदेशाचे उल्लंघन करून विक्री करणाऱ्यांची भाजीपाला व फळे जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...