कऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला  

कऱ्हाड, जि.सातारा : कऱ्हाड शहरातील मुख्य भाजी मंडईत खरेदीसाठी होणारी गर्दी विचार घेवून पालिकेने शुक्रवारी (ता.२७) मंडई बंद केली. त्याऐवजी सातही पेठांमध्ये घरपोच भाजीपाला देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. पालिका व बाजार समितीच्या सहकार्याने भाजीपाल्याची आवक देखील सुरू झाली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कऱ्हाड, जि.सातारा  :  कऱ्हाड शहरातील मुख्य भाजी मंडईत खरेदीसाठी होणारी गर्दी विचार घेवून पालिकेने शुक्रवारी (ता.२७)  मंडई बंद केली. त्याऐवजी सातही पेठांमध्ये घरपोच भाजीपाला देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. पालिका व बाजार समितीच्या सहकार्याने भाजीपाल्याची आवक देखील सुरू झाली आहे.

विक्रेत्यांना ठराविक अंतरावर  ठेवून विक्री करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यासाठी पालिकेने आखून दिलेल्या चौकानात विक्रीचे आदेश दिले. मात्र शुक्रवारी सकाळी मंडईत नागरिकांनी नेहमीप्रमाणे गर्दी केली. त्यामुळे मंडई बंदचा निर्णय घेण्यात आला. त्यावर उपाय म्हणून पालिकेने पेठनिहाय भाजीपाला घरपोच देण्याची सुविधा सुरु केली. त्यासाठी सात पेठांमध्ये १४ ठिकाणी १७ लोकांकडून भाजीपाला विक्रीची सोय केली आहे. प्रत्येक विक्रेत्याचा मोबाईल क्रमांक देवून त्यांना ऑर्डर दिल्यास ते भाजीपाला घरपोच करणार आहेत. 

शुक्रवारी सकाळपासून बाजार समितीत शेतीमालाची आवक सुरू झाली. त्यामुळे  भाजीपाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे.  पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी त्याबाबत बाजार समितीमधील  एकता संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश थोरात यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार फळे व भाजीपाला मार्केटमध्ये पूर्ववत कामकाज सुरू झाले. शेतीमालाची आवक सुरू झाल्याने शहरातील भाजीपाल्याचा तुटवडा संपुष्टात येणार आहे. उपाध्यक्ष थोरात यांनी शहरात मुख्याधिकारी डांगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, बाजार समितीचे उपसभापती विजयकुमार कदम यांच्या सहकार्याने भाजीपाला विक्री नियमित सुरू झाल्याचे सांगितले.

ही आहेत ठिकाणे  शहरात काही पेठा मोठ्या आहेत. त्याची विभागणी करून भाजीपाल्याचे वाटप करण्याचे नियोजन केले आहे. त्यात मंगळवार पेठेतील मुळीक पंप ते कन्या प्रशाला, सुशांतनगर परिसर, वाखाण परिसर असे भाग केले आहेत. बुधवार पेठेत शिवाजी हौसिंग सोसायटी, उपजिल्हा रूग्णालय व मुळ बुधवार पेठ आणि शनिवार पेठेत आझाद चौक ते दत्त चौक, दत्त चौकापासून कोयना दूध कॉलनी ते कोल्हापूर नाका, कार्वे नाका, मुजावर कॉलनी, सुपर मार्केट अशी विभागणी भाजीपाला विक्रीसाठी केली आहे. ------  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com