पुण्यातील लाॅकडाउनमुळे कोल्हापुरातील भाजीपाल्याचे मोठे नुकसान शक्य

पुणे बाजारसमिती बंद असल्याने स्थानिक बाजारात पहिल्याच दिवशी फ्लॉवरच्या दरात प्रतिदहा किलोमागे १० ते २० रुपयांची घट झाली. येथून पुढे भाजीपाल्याची विक्री कशी करायची, अशी चिंता आहे. - सुधीर पाटील, भाजीपाला उत्पादक, कोल्हापूर.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पुण्यात सोमवारी मध्यरात्रीपासून पुन्हा लॉकडाउन सुरू केल्याने भाजीपाला विक्रीसाठी पाठवण्यात अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मंगळवारी(ता.१४) पहिल्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील ५० ट्रकहून अधिक भाजीपाला स्थानिक बाजारपेठेत विकला गेला. जादा शेतमाल आवक झाल्याने दरात वीस टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. पुण्यातील लॉकडाउनमुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

शिरोळ, हातकणंगले तालुक्यातून दररोज ५० ते १०० ट्रक भाजीपाला पुणे बाजार समितीत जातो. लॉकडाउनबाबत आधीच कल्पना असल्याने भाजीपाला उत्पादक संघांनी पुण्याकडे जाणारे ट्रक भरले नाहीत. सध्या या दोन तालुक्यांतून फ्लॉवर, कोबी, ढोबळी मिरची आदी भाजीपाला पुणे बाजारसमितीत जात होता. हा भाजीपाला पुरवठा सध्या ठप्प झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बहुतांशी भाजीपाला स्थानिक बाजारपेठेतच विकावा लागणार आहे. यामुळे येत्या पंधरा दिवसांत भाजीपाला दरावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com