Farming Agricultural News Marathi Water use societies will be established Pune Maharashtra | Agrowon

राज्यात ५८२० पाणी वापर सोसायट्या स्थापन होणार

टीम अॅग्रोवन
रविवार, 31 मे 2020

महाराष्ट्रानेच देशाला पाणी वापर सोसायट्यांची संकल्पना आणि एक सक्षम कायदा मिळवून दिला आहे. दुर्दैवाने सोसायट्या भरपूर झाल्या पण त्या केवळ कागदावर राहिल्या. यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारी यंत्रणेला आत्मपरीक्षण करावे लागेल. जगभर चालते तसे कालबद्ध मूल्यमापन करीत कामकाजात सातत्याने बदल घडवून आणावे लागतील.
- एस. ए. कुलकर्णी, माजी सचिव, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण

पुणे  : राज्यातील विविध धरणांच्या क्षेत्रात नव्याने ५ हजार ८२० पाणी वापर संस्था सोसायट्या स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याद्वारे
संस्थांच्या लाभक्षेत्राखाली किमान २९ लाख ३८ हजार शेतजमिनी ओलिताखाली येणार आहे.

“पाणी वापर सोसायट्यांच्या स्थापनेसाठी अत्यावश्यक असलेल्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यास सोसायट्यांच्या लाभक्षेत्राखाली किमान २९ लाख ३८ हजार शेतजमिनी येतील. या सोसायट्या स्थापन झाल्याशिवाय पाण्याचे वाटप सरकारी यंत्रणेकडून शेतकरी वर्गाच्या हातात जाणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

पाणी वापर सोसायट्यांची संकल्पना पुढे नेण्यासाठी मानसिकतेत बदल करावे लागेल, असे मत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे माजी सचिव एस. ए. कुलकर्णी यांनी व्यक्त केले. “सिंचन विकासासाठी अत्यावश्यक ठिकाणी खासगी क्षेत्राचीही मदत घ्यावी लागेल. त्याशिवाय ही संकल्पना पुढे जाणार नाही,” असेही श्री.कुलकर्णी यांचे मत आहे.
राज्यात सध्या दोन हजार ९५६ पाणी वापर सोसायट्या स्थापन झालेल्या आहेत. या सोसायट्यांच्या अखत्यारीत ११ लाख ७२ हजार हेक्टर क्षेत्र येते. तथापि, सरकारी यंत्रणेने मिशन मोडवर काम केल्यास अजून आठ हजार सोसायट्या स्थापन होऊ शकतात. यातून शेतकऱ्यांच्या ताब्यात ३५ लाख हेक्टर लाभक्षेत्र देता येऊ शकते.

शेतकऱ्यांसाठी दोन माध्यमातून पाणी वापर सोसायट्या तयार झालेल्या आहेत. यात २००५ च्या महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायद्याच्या अखत्यारीत दोन हजार २८५ सोसायट्या तयार झालेल्या आहेत. तसेच, १९५० च्या सहकार कायद्यान्वये ६७१ संस्था तयार झालेल्या आहेत.

दोन्ही कायद्यानुसार राज्यात तीन हजाराच्या आसपास सोसायट्या तयार झाल्या. मात्र, काही ठिकाणी कामे कागदोपत्रीच सुरू आहे. या सोसायट्या शेतकरीभिमुख करण्याचे मोठे आव्हान जलसंपदा विभागासमोर आहे.

“सहकारी कायद्याच्या अखत्यारीत ५५ ठिकाणी केवळ करारनामे होणे बाकी आहे. दोन्ही कायद्यानुसार सोसायट्यांची नोंदणी झाली. मात्र, करारनाम्याची प्रक्रिया झालेली नाही. ही प्रक्रिया झाल्यास दोन हजार ठिकाणी सोसायट्यांच्या कामाला सुरुवात होऊ शकते,” असे सूत्रांनी स्पष्ट केले.

 


इतर अॅग्रो विशेष
कृषी पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींचा...नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतमाल काढणीपश्‍चात...
अजून एक `लातूर पॅटर्न’कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर एप्रिल, मे, जून...
सत्त्वयुक्त उत्पादनांची हवी कृषी...माणसाच्या उपभोगासाठी उपयुक्त असलेली जैवविविधता...
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
कृषी योजनांचे उद्दिष्ट तीन...नगर ः कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात...
राज्यातील २५ लाख खातेदारांना साडेसोळा...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
दूध भुकटी योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
जिल्हा बँकांना शासकीय व्यवहार करण्यास...मुंबई : शासकीय निधीची सुरक्षितता लक्षात घेऊन...
राज्यात सावकारांकडून दरमहा १०० कोटींचे...सोलापूर : राज्यात मागील पाच वर्षांत तब्बल ७५२...
नियमनमुक्तीला पुणे महापालिकेचा हरताळपुणेः एकीकडे केंद्र आणि राज्य शासन शेतमाल बाजार...
विदर्भात वादळी पावसाचा अंदाजपुणे: कोकण, घाटमाथ्यावर मॉन्सूनचा पाऊस सक्रिय...
मराठवाड्यात सोयाबीनची सरासरीपेक्षा अधिक...औरंगाबाद : खरिपाच्या पेरण्या जवळपास ८३ टक्के...
कृषी व्यापार अध्यादेशामुळे दिलासापुणे: केंद्राने काढलेल्या ‘कृषी उत्पादने व्यापार...
खानदेश, मराठवाडा, वऱ्हाडात पावसाच्या सरीपुणे : मॉन्सूनचा पाऊस सक्रिय असल्याने कोकणासह...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
‘सरफेसी' कायदा आहे तरी काय? दिवसेंदिवस बॅंकांच्या थकीत रकमेत वाढ दिसून येत...
लष्करी’ हल्लाखरीप हंगामाच्या सुरवातीलाच राज्यात मका पिकावर...
कोकणात जोरदार पावसाची शक्यता पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने गेल्या काही...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू...