तिडे येथे १४५ एकरांवरील कलिंगडे सडण्याची भिती

यंदा कलिंगडाचे पिक चांगले असूनही ‘कोरोना’च्या संकटामुळे सर्वच शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतीसाठी लागणारे भागभांडवल त्यांनी खाजगीतून मिळविले आहे. या संकटामुळे पैसे परत करता येणे शक्य नसल्याने सावकारी विळख्यात शेतकरी अडकण्याची भिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या आपत्तीकडे शासनाने लक्ष देत त्यांना कर्जमाफी देऊन अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घ्यावा. प्रशासकीय यंत्रणनेही शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. - सुभाष पवार, राज्य शासन पुरस्कार प्राप्त शेतकरी.
आदिवासींनी लागवड केलेली कलिंगडे मागणी अभावी शेतातच सडून जाण्याची शक्यता आहे.
आदिवासींनी लागवड केलेली कलिंगडे मागणी अभावी शेतातच सडून जाण्याची शक्यता आहे.

चिपळूण, जि. रत्नागिरी  ः मंडणगड तालुक्यातील तिडे आदिवासीवाडी येथे १४५ एकर क्षेत्रावर आदिवासी बांधवांनी कलिंगडची लागवड केली आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असून व्यापाऱ्यांनी मालाची उचल बंद केली आहे. त्यामुळे २२ हजार ५०० टन माल शेतातच सडून जात आहे. या पिकावर येथील शेतकऱ्यांची वर्षभराची उपजिविका अवलंबून असते. मात्र या स्थितीमुळे त्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे.

तिडे परिसरात भारजा नदीच्या पाण्यावर २००६ पासून कलिंगड पिकाची लागवड करण्यात येते. त्यातून कोट्यवधींची आर्थिक उलाढाल होते. त्यामुळे अल्पावधीतच हे गाव कलिंगडाचे गाव म्हणून ओळखले जावू लागले. यावर्षी १८ शेतकऱ्यांनी सुमारे १४५ एकरांवर कलिंगडाची लागवड केली आहे. मात्र वाशी व अन्य मार्केटमधील व्यापारी गेल्या आठ दिवसांपासून येण्याचे बंद झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. या शेतकऱ्यांकडे स्वतःच्या जमिनी नाहीत, राष्ट्रीयिकृत बँका त्यांना या व्यवसायाकरिता अर्थसहाय्य करीत नाहीत.

अनेक अडचणी असताना देखील परिसरातील शेतकरी भाडेतत्वावर जागा व खाजगीतून अर्थसहाय्य मिळवून अनेक वर्षे नफ्याची शेती करीत आहेत. नोव्हेंबर महिन्यापांसून करीत असलेल्या मेहनतीला यंदा उत्तम उत्पन्नाची जोड मिळाली होती. त्यामुळे शेतकरी समाधानी होते. दोनशेहून अधिक मोठ्या गाड्या माल विकला जाईल व त्यातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल असा शेतकऱ्यांचा अंदाज होता. मात्र ‘कोरोना’च्या संकटामुळे आजअखेर केवळ बारा गाड्या माल विक्रीसाठी गेला आहे.

अनेक भरलेल्या गाड्या परत आल्या. मोठया बाजारपेठा बंद आहेत व स्थानिक बाजारपेठेत संचारबंदीमुळे मालच विकू शकत नाही. एका शेतकऱ्याचा राष्ट्रीयिकृत बँकेचे अर्थसहाय्याचा अपवाद वगळता प्रत्येक शेतकऱ्यावर दोन ते पाच लाखांपर्यंतचा खासगी कर्जाचा डोंगर आहे. शेतात पिक तयार आहे. चार दिवसांत या समस्येवर तोडगा निघाला नाही तर पुर्ण पिकच शेतात जागेवर सडून जाण्याची शक्यता आहे.

लागवड केलेले शेतकरी व त्यांचे क्षेत्र (एकर) ः नागेश हिलम १६, सुभाष पवार, कृष्णा हिलम ११, प्रकाश काटेकर १४ , सुनील जगताप, काशीराम कोळी १४, संदीप जगताप, मंगेश पवार ७, लक्ष्मण पवार ४, बाळाराम पवार ५, सचिन येसरे ५ तर पेण येथील प्रकाश पाटील १०, कृष्णा जगताप ३, लक्ष्मण पाटील १८, दत्ताराम पाटील, पांडुरंग पाटील १६, नथुराम पाटील ७, महादेव म्हात्रे १५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com