राहुरी विद्यापीठ देणार हवामान अंदाजानुसार तालुकानिहाय कृषीसल्ला

महात्मा फुले कृषी विद्यापाठातून शेतकऱ्यांना हवामान अंदाज आणि कृषी सल्ला दिला जातो. त्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. आता पुन्हा नव्याने विद्यापीठ आणि भारत मौसम विज्ञान विभागादरम्यान करार झाला आहे. आता तालुकापातळीवर हवामानाचा अंदाज व कृषी सल्ला देण्याचा प्रयत्न होणार आहे. - डॉ. रवि आंधळे, हवामान विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर   ः महात्मा फुले कृषी विद्यापीठातून शेतकऱ्यांना आतापर्यंत जिल्हा पातळीवरील हवामानाची माहिती व कृषी सल्ला दिला जात होता. आता तालुका पातळीवर अंदाजानुसार हवामानाची माहिती व कृषी सल्ला दिला जाणार आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील भारत मौसम विज्ञान विभाग यांच्यामध्ये नव्याने पाच वर्षांकरिता ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्पाचा सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाअंतर्गत असलेल्या दहा जिल्ह्यांतील तालुक्‍यांना त्याचा लाभ होणार आहे.

शेतकऱ्यांना हवामानाबाबत कृषी विद्यापाठातून माहिती दिली जाते. त्यासाठी राहुरी (जि. नगर), इगतपुरी (जि. नाशिक), पुणे आणि कोल्हापूर येथे चार हवामान केंद्रे आहेत. हवामानाबाबत माहिती देण्यासंदर्भात व त्यासाठी लागणारा निधी खर्च करण्याबाबत महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि भारत मौसम विज्ञान विभागादरम्यान दर पाच वर्षाला सामंजस्य करार केला जातो. यंदा पुन्हा नव्याने पाचव्यांदा या सामंजस्य करारारावर विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख व कृषी मौसम संभाग भारत मौसम विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. के. के. सिंह यांनी कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली. अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, डॉ. आनंद सोळंके, डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. जयवंत जाधव व डॉ. रवी आंधळे या वेळी उपस्थित होते. 

विद्यापीठाच्या हवामान केंद्रातून यापूर्वी पुढील पाच दिवसांचा संपूर्ण जिल्ह्याचा हवामान अंदाज दिला जात होता. मात्र अनेक तालुक्‍यांचे अंतर एकमेकांपासून दूर असल्याने बहुतांश वेळा हवामान अंदाज चुकीचा ठरत होता. त्यामुळे यंदापासून ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्पामधून पहिल्यांदाच तालुका पातळीवरील हवामानाचा अंदाज व कृषी सल्ला दिला जाणार आहे.

विद्यापीठाअंतर्गत असलेल्या नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, सोलापरू, नाशिक या जिल्ह्यांमधील सर्व तालुकापातळीवर हवामानाचा अचूक अंदाज मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा ठरणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com