Farming Agricultural News Marathi weather prediction pune maharashtra | Agrowon

राज्यात आज पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

पुणे  ः गेल्या काही दिवसांपासून पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावाही झाला आहे. आज (ता. २६) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात चढउतार होत असून, गारठा कमी झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे  ः गेल्या काही दिवसांपासून पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावाही झाला आहे. आज (ता. २६) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात चढउतार होत असून, गारठा कमी झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्यालगतच चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ हवामान आहे. मंगळवारी (ता. २४) सायंकाळी पुणे आणि जुन्नर परिसरात हलका पाऊस पडला. बुधवारी (ता. २५) दिवसभर राज्यातील अनेक भागांत हवामान ढगाळ होते. यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी नाशिकमधील निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये १३.० अंश सेल्सिअस अशी सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे.

ढगाळ हवामानामुळे कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर परिसरातील किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. या भागात किमान तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रासह खानदेशातही गारठा कमी झाला आहे. या भागात किमान तापमान १३ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मराठवाड्यातही किमान तापमान १७ ते २० अंश सेल्सिअसपर्यंत होते. विदर्भातील अनेक भागांत गारठ्यात चढउतार आहे. चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, अमरावती, वर्धा, यवतमाळ या भागांतील किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते.  

बुधवारी (ता. २५) सकाळी विविध ठिकाणचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः  अकोला १७.५ (४), अलिबाग २४.६ (६), अमरावती १७.० (२), औरंगाबाद १७.९ (६), बीड २०.६ (७), बुलडाणा १९.० (५), चंद्रपूर १५.० (२), डहाणू २३.३ (५), गोंदिया १४.६ (२), जळगाव २१.० (८), कोल्हापूर २०.१ (५), महाबळेश्वर १५.८ (३), मालेगाव २१.२ (१०), मुंबई २४.२ (६), नागपूर १५.८ (३), नांदेड १५.० (३), नाशिक १९.८ (१०), निफाड १३.०, परभणी १९.० (६), लोहगाव २०.५ (९), पाषाण १९.७ (९), पुणे १९.५ (९), रत्नागिरी २२.८ (३), सांगली १९.२ (५), सातारा १८.३ (६), सोलापूर १९.७ (४), वर्धा १७.२ (४). 


इतर अॅग्रो विशेष
शेतीमाल थेट विक्रीचा समन्वय भक्कम केला...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी...
राज्यात शुक्रवारपासून वादळी पावसाचा...पुणे  : राज्यात उन्हाचा ताप वाढत असल्याने...
कृषी रसायन कंपन्यांचा कच्चा माल अडकलापुणे  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लागू...
व्यावसायिक चातुर्यातून ४० टन कलिंगडाची...कोरोना संकटामुळे शेतमाल विक्री व्यवस्था अडचणीत...
गोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात...सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५...
‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत...नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव...
राज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण;...पुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची...
मराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या...
रब्बी कांदा उत्पादन २५ लाख टनांनी वाढणारपुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या...
भाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम...कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही...
अर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे...कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर...
पूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामानपुणे  : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने...
`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...
राज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...