Farming Agricultural News Marathi weather prediction pune maharashtra | Agrowon

राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 मे 2020

पुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असल्याने जोरदार वारे वाहू लागले आहे. उन्हाचा चटका कमी होण्यास सुरुवात झाली असली तरी विदर्भात मात्र उष्णतेची लाट कायम आहे. आजपासून (ता.३०) राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भात विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शुक्रवारी (ता.२९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील बुलडाणा येथे उच्चांकी ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असल्याने जोरदार वारे वाहू लागले आहे. उन्हाचा चटका कमी होण्यास सुरुवात झाली असली तरी विदर्भात मात्र उष्णतेची लाट कायम आहे. आजपासून (ता.३०) राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भात विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शुक्रवारी (ता.२९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील बुलडाणा येथे उच्चांकी ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात जवळपास आठवडाभर उन्हाचा चटका वाढून अनेक भागात उष्ण लाट आली. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील बुलडाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान असल्याने उष्ण लाट होती. उर्वरित राज्यातील लाट ओसरली असली तरी उन्हाचा चटका तापदायक ठरला. आजपासून (ता.३०) विदर्भासह संपूर्ण देशभरातील उष्ण लाट ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राजस्थानातील गंगानगर येथे देशातील उच्चांकी ४६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असून, दिवसभर चटका कायम राहून दुपारनंतर वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
 
शुक्रवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.२, नगर ४३.१, धुळे ४२.०, जळगाव ४२.८, कोल्हापूर ३६.१, महाबळेश्‍वर ३०.१, मालेगाव ४३.०, नाशिक ३७.५, निफाड ३७.५, सांगली ३७.८, सातारा ३६.८, सोलापूर ४१.५, डहाणू ३४.९, सांताक्रूझ ३४.५, रत्नागिरी ३४.८, औरंगाबाद ४१.८, परभणी ४४.०, नांदेड ४४.०, अकोला ४४.२, अमरावती ४३.६, बुलडाणा ४६.६, ब्रह्मपुरी ४४.८, चंद्रपूर ४६.०, गोंदिया ४३.८, नागपूर ४६.३, वर्धा ४५.५.


इतर अॅग्रो विशेष
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे;...औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा...
शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठीअकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने...
देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता...पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यात ५४...पुणे ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत...
आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला...मुंबई: आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला,...
बांगलादेशात रेल्वेद्वारे कांदा निर्यातनाशिक: जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा...
देशात आता जनुक क्रांतीची गरज : माजी...पुणे: देशाला आता हरितक्रांती नव्हे तर आता जनुक...
शेळ्या-मेंढ्यांचे बाजार सुरु करा  नगर ः सध्या आषाढ महिना सुरु असून या महिन्यात...
बियाणे संबंधित तक्रारींचा तत्काळ निवाडा...नाशिक: निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर...
संत्रा उत्पादन वाढीचा अंदाजअमरावती ः पोषक वातावरणाच्या परिणामी या वर्षी...
मागण्या मान्य करा, अन्यथा दूध पुरवठा...औरंगाबाद  : अत्यल्प दर मिळत असल्याने आम्ही...
उथळ निर्णय की सखोल अभ्यासकेंद्र सरकारने ग्लायफोसेटचा वापर देशभर केवळ कीड...
लसीला लागण राजकारणाची ?‘कोरोना’ग्रस्ततेत अमेरिकेचा प्रथम क्रमांक आहे....
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...