Farming Agricultural News Marathi zillha parishad will give cotton seeds on subsidy Akola Maharashtra | Agrowon

अकोला झेडपी शेतकऱ्यांना अनुदानावर देणार बीटी कपाशी बियाणे  

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मे 2020

अकोला  ः यंदा विविध संकटांमुळे हवालदिल असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने अकोला जिल्हा परिषद खरीप हंगामात त्यांना मदत करणार आहे. जिल्ह्यातील अल्पभूधारक, सर्वसाधारण शेतकऱ्यांना एक एकरात लागवडीसाठी लागणाऱ्या बीटी कपाशी बियाण्यावर ९० टक्के अनुदान देणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे ५ जूनपर्यंत अर्ज करावेत असे आवाहनही करण्यात आले आहे. याकरिता १५ लाख रुपयांची सुरुवातीला तरतुद करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र आता यात वाढ केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अकोला  ः यंदा विविध संकटांमुळे हवालदिल असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने अकोला जिल्हा परिषद खरीप हंगामात त्यांना मदत करणार आहे. जिल्ह्यातील अल्पभूधारक, सर्वसाधारण शेतकऱ्यांना एक एकरात लागवडीसाठी लागणाऱ्या बीटी कपाशी बियाण्यावर ९० टक्के अनुदान देणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे ५ जूनपर्यंत अर्ज करावेत असे आवाहनही करण्यात आले आहे. याकरिता १५ लाख रुपयांची सुरुवातीला तरतुद करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र आता यात वाढ केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

यावर्षी ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ग्रामीण कृषी अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. दुसरीकडे जागतिक परिस्थितीचा विचार करता यावर्षी भारतातील कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन अकोला जिल्ह्यातील अल्पभूधारक सर्वसाधारण शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देत उत्पन्न वाढविण्याच्यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा भोजने आणि कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांच्या पुढाकाराने २०२०-२१मधील खरीप हंगामात कपाशी बीजी-२ बीटी बियाणे लागवडीसाठी ९० टक्के अनुदान योजनेस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

ही योजना अकोला जिल्ह्यातील सर्वसाधारण अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असून प्रतिलाभार्थी कमाल एक एकरासाठी दोन कपाशी बियाणे पाकिटे याप्रमाणे मर्यादित राहिल. यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा, नमुना ८अ उतारा, आधार कार्ड संलग्न बँक खाते पुस्तिकेच्या पहिल्या पानाची सत्यप्रत, अपंग असल्यास तसे अधिकृत प्रमाणपत्र अर्जासोबत ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीला सादर करावे लागेल.

पंचायत समिती स्तरावर छाननी करून पात्र लाभार्थ्यांची यादीतून कृषी समितीद्वारे लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्यात येईल. निवड झालेल्या लाभार्थ्यांनी अधिकृत परवानाधारक निविष्ठा विक्रेत्यांकडून संकरित कपाशी बीटी बियाणे खरेदी करून विहित खरेदी पावती कृषी विभागाकडे सादर केल्यानंतर ९० टक्के अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) द्वारे लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. पेरणीनंतर कपाशी क्षेत्राची तपासणी करण्यात येईल. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिष अध्यक्षा प्रतिभा भोजने, कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी केले आहे.


इतर बातम्या
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
‘निसर्ग’चे किनारपट्टीलगत थैमानपुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पुणे: अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा...
प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...