Farming Agricultural News Update Marathi flowers damage due lock down Satara Maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फुलांवर फिरवला नांगर

हेमंत पवार
मंगळवार, 28 एप्रिल 2020

एका एकरातील झेंडूतून दिड लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. पण कोरोनामुळे मंदिरे, कार्यक्रम, लग्न, यात्रा बंद झाल्याने फूलांना मागणीच राहिली नाही. परिणामी दीड महिना शेतातच फुले वाळली. त्यामुळे मोठे नुकसान झाले.
- हणमंतराव माळी, फुल उत्पादक शेतकरी, उंडाळे, जि. सातारा.

कऱ्हाड, जि. सातारा ः लॉकडाउनमुळे फुले बाजारपेठेत येत नाहीत. त्यामुळे गेल्या महिना-दीड महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या शेतातच फुले सडत आहेत. आज ना उद्या हे लॉकडाउन संपेल या आशेवर शेतकरी होते. मात्र कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने आता लॉकडाउन लवकर संपण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता लाखो रुपयांचा तोटा सोसून नाईलाजाने काळजावर दगड ठेवत फुलांवर नांगर, रोटाव्हेटर फिरवण्यास सुरुवात केली आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकरी आता शेत मोकळे करु लागले आहेत. फुलांसाठी केलेला उत्पादन खर्चही भरुन न निघाल्याने फुल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

सातारा जिल्ह्यातील शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत नवीन पिके, फुले, फळांचे उत्पादन घेत आहेत. त्यातून त्यांना चांगले पैसे मिळत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी मार्च, एप्रिल, मे महिन्यात लग्नाचा हंगाम, जत्रा-यात्रा, सण, उत्सवाचे औचित्य साधुन त्यापुर्वी तीन महिने फुलांची लागवड केली होती. आता ती फुले मार्केटमध्ये येण्याची वेळ आणि लॉकडाउनची वेळ एकच आली. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर हे नवीनच संकट उभे राहिले. फुलांचा हंगाम ऐन भरात आला आणि कोरोनाने डोकं वर काढलं. त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी त्यामध्ये अडकला. सुमारे दीड महिन्यांपासून सुरु असलेल्या या लॉकडाउनमुळे फुले शेतातच सडत पडली आहेत.

प्रशासनाने शहरातील फुलांची दुकाने, मार्केटमधील फुलांचे व्यवहारच बंद केले. त्यामुळे फुलांना व्यापाऱ्यांकडून मागणीच होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांनी फुलांवर नांगर फिरवण्यास सुरुवात केली आहे. मात्र फुलांसाठी काढलेले कर्ज, हातउसने घेतलेले पैसे, मशागातीसाठी खर्च झालेले पैसे कशातून काढायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
 
शासनाने सर्वेक्षण करुन भरपाई द्यावी
सरकारने बाजारपेठेत शेतमाल आणायला परवानगी दिली. मात्र फुले आणायला दिली नाही. फुलशेती हा शेतीचाच एक भाग आहे. मात्र दुजाभाव करण्यात आला. त्यामुळे फुले बाजारपेठेत न येतात शेतातच खराब झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने घेतलेली फुले वाया गेली. त्यातून शेतकऱ्यांनाही लाखो रुपयांचा फटका बसला आहे. सरकारने, प्रशासनाने फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार करुन नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
 
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...