Farming Agricultural News Update Marathi give essential services to workers Kolhapur Maharashtra | Agrowon

कारखानदारांनी कामगारांची सोय न केल्यास कारवाई ः जिल्हाधिकारी दौलत देसाई

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

कोल्हापूर  ः सर्व कारखानदारांनी त्यांचे काम पूर्ण झाले म्हणून कामगारांना वाऱ्यावर सोडू नये. हे माणुसकीला धरुन नाही. त्यांची राहण्याची, खाण्याची तसेच वैद्यकीय सोय करावी. कामगारांकडे दुर्लक्ष केल्याची बाब जर निदर्शनास आली तर त्या कारखानदाराविरुध्द फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे.

कोल्हापूर  ः सर्व कारखानदारांनी त्यांचे काम पूर्ण झाले म्हणून कामगारांना वाऱ्यावर सोडू नये. हे माणुसकीला धरुन नाही. त्यांची राहण्याची, खाण्याची तसेच वैद्यकीय सोय करावी. कामगारांकडे दुर्लक्ष केल्याची बाब जर निदर्शनास आली तर त्या कारखानदाराविरुध्द फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे.

परराज्यातून आलेले तसेच इतर जिल्ह्यांतून आलेले कामगार लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. त्यांना त्यांच्या राज्यात परत जाण्याची इच्छा होती. परंतु राज्य, जिल्हा बंदीच्या परिस्थितीत अशा कामगारांना त्यांच्या राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी देता येत नाही, असे सांगून जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, की जिल्ह्यामध्ये सध्या तीन साखर कारखाने सुरु आहेत. दोन दिवसांत ते बंद होतील. साखर कारखान्यांनी त्यांच्या कामगारांची योग्य सोय करावी. एमआयडीसी किंवा इचलकरंजी परिसरात कापड उद्योगांमधील कामगार हे परराज्यातील असले तरी ते त्या ठिकाणी निवासी कामगार आहेत. अशा कामगारांसाठी जीवनावश्यक वस्तुंची सुविधा करण्याचे निर्देश कारखान्यांच्या मालकांना दिले आहेत.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...