Farming Agricultural News Update Marathi permission for agriculture goods transport Solapur Maharashtra | Agrowon

अत्यावश्यक सेवेतील शेतीमाल वाहतुकीस परवानगी ः मनोज पाटील

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

सोलापूर  ः अत्यावश्यक सेवा म्हणून माल वाहतूक करणारे ट्रक आणि शेतीमाल वाहतूक वाहनांना पोलिसांनी परवानगी दिली आहे. अशी परवानगी असलेल्यांनी प्रत्येक वाहनावर डाव्या बाजूला पुढील काचेवर अत्यावश्यक सेवा असा कागदी बोर्ड लिहून वाहतूक करावी, तशा सूचना संबंधित सर्व पोलिसांना दिल्या आहेत. त्यामुळे शेतीमालाची सर्वप्रकारची वाहतूक सुरळीत राहिल, संबंधितांना कोणीही अडवणार नाही, असे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

सोलापूर  ः अत्यावश्यक सेवा म्हणून माल वाहतूक करणारे ट्रक आणि शेतीमाल वाहतूक वाहनांना पोलिसांनी परवानगी दिली आहे. अशी परवानगी असलेल्यांनी प्रत्येक वाहनावर डाव्या बाजूला पुढील काचेवर अत्यावश्यक सेवा असा कागदी बोर्ड लिहून वाहतूक करावी, तशा सूचना संबंधित सर्व पोलिसांना दिल्या आहेत. त्यामुळे शेतीमालाची सर्वप्रकारची वाहतूक सुरळीत राहिल, संबंधितांना कोणीही अडवणार नाही, असे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

पोलिस आणि प्रशासनाने अत्यावश्यक सेवा म्हणून शेतीमाल वाहतुकीला परवानगी दिली आहे. त्याचे तंतोतंत पालन व्हावे, परंतु शेतीमालाच्या वाहनातून प्रवासी वाहतूक करताना कोणी आढळल्यास पोलिस कारवाई करतील, पण शेतमाल वाहतूक करताना जर कोणत्या पोलिसांनी अडवले तर थेट पोलिस नियंत्रण कक्षाच्या ०२१७-१०० या क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

त्यासाठी मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची कागदपत्रे, चालक परवाना ही कागदपत्रे आवश्यक आहेत. जिल्ह्यातील शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी सोलापुरात आणू शकतात अथवा परजिल्हा, अन्य राज्यातही जाऊ शकतात. यासाठी आरटीओची परवानगी पाहिजे. जिल्हाअंतर्गत परवानगीची आवश्यकता नाही. अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा होत राहावा आणि या वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये, अशी सूचना सरकारी पातळीवर देण्यात आली आहे. यासाठीच संचारबंदीतून अत्यावश्यक सेवा व वस्तू यांना वगळ्यात आले आहे. अशा सेवेतील वाहनांना परवानगी घेणे बंधनकारक आह, असेही त्यांनी सांगतले.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...