Farming Agricultural News Update Marathi police harass to farmer Nagar Maharashtra | Agrowon

साहेब, पोलिसांच्या त्रासापासून मला वाचवा : युवा शेतकऱ्याची याचना

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 एप्रिल 2020

नगर  ः काकडी विक्रीला घेऊन जाताना मोफत दोन किलो काकडी दिली नसल्याचा राग धरुन गेल्या सहा दिवसांपासून पोलिस कर्मचाऱ्याकडून त्रास दिला जात आहे. कधीही अवेळी येऊन घराची झडती घेत आहेत. त्यांच्या दहशतीपोटी मी सहा दिवसांपासून घराबाहेर आहे. त्यामुळे मी त्रस्त झालो असून मला बेलवंडी पोलिस ठाण्यातील पोलिसांकडून होणाऱ्या त्रासापासून वाचवा, अशी याचना वाडेगव्हाण (ता. पारनेर) येथील प्रगतिशील युवा शेतकरी दीपक प्रभाकर खंदारे यांनी नगर येथील पोलिस अधीक्षकांकडे मेलवर निवेदन देऊन केली आहे.

नगर  ः काकडी विक्रीला घेऊन जाताना मोफत दोन किलो काकडी दिली नसल्याचा राग धरुन गेल्या सहा दिवसांपासून पोलिस कर्मचाऱ्याकडून त्रास दिला जात आहे. कधीही अवेळी येऊन घराची झडती घेत आहेत. त्यांच्या दहशतीपोटी मी सहा दिवसांपासून घराबाहेर आहे. त्यामुळे मी त्रस्त झालो असून मला बेलवंडी पोलिस ठाण्यातील पोलिसांकडून होणाऱ्या त्रासापासून वाचवा, अशी याचना वाडेगव्हाण (ता. पारनेर) येथील प्रगतिशील युवा शेतकरी दीपक प्रभाकर खंदारे यांनी नगर येथील पोलिस अधीक्षकांकडे मेलवर निवेदन देऊन केली आहे.

दिपक खंदारे यांनी पोलिस अधीक्षकांसह जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी आयुक्त व अन्य ठिकाणी पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे, की मी काकडीसह विविध शेतपिकांचे उत्पादन घेतो. सध्या लॉकडाउन असल्याने मी १७ एप्रिलला सायंकाळी ट्रॅक्टरमध्ये काकडी घेऊन शिरुर (जि. पुणे) येथे विक्रीसाठी जात असताना दुचाकीवर आलेल्या एका व्यक्तीने मला दोन किलो काकडी मोफत मागितली. ही काकडी व्यापाऱ्याला विकलेली असल्याने देता येत नसल्याचे सांगितल्यावर त्या व्यक्तीने मला मारहाण केली. त्यानंतर संबंधित व्यक्ती पोलिस असल्याचे कळाले.

मोफत काकडी दिली नसल्याचा राग धरुन त्यांच्यासह बेलवंडी पोलिस ठाण्यातील पोलिस मला त्रास देत असून आत्तापर्यंत दोन वेळा घरी येऊन झडती घेतली आहे. मला मारणार असल्याचे माझ्या कुटुंबीयांजवळ ते बोलत आहेत. मला पोलिस ठाण्यात बोलावत आहेत. त्यामुळे मी सहा दिवसांपासून बेलवंडी पोलिसांच्या दहशतीखाली असून घरी गेलो नाही. मला बाजारात जाण्यासह भिती वाटत असल्याने शेतात माझ्या मालाची नासाडी होत आहे. माझे काही बरेवाईट झाल्यास बेलवंडी पोलिस जबाबदार राहतील, असे स्पष्ट करतानाच पोलिस अधीक्षकांनी यात लक्ष घालून मला होणारा मानसिक त्रास थांबवावा आणि मला वाचवावे, असे खंदारे यांनी निवेदनात म्हटले आहे.


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...