Farming Agricultural News Update Marathi take a Legal action in case of black marketing of seeds and fertilizers Nagar Maharashtra | Agrowon

बियाणे, खतांचा काळाबाजार केल्यास फौजदारी कारवाई : जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 मे 2020

नगर  ः खरीप हंगामात बियाणे, खतांचा काळाबाजार झाला तर फौजदारी कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी सांगितले. खते, बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी १५ भरारी पथके नियुक्त केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

नगर  ः खरीप हंगामात बियाणे, खतांचा काळाबाजार झाला तर फौजदारी कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी सांगितले. खते, बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी १५ भरारी पथके नियुक्त केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

नगर जिल्ह्यात खरिपाची पावणेसहा लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, कापूस लागवड होण्याचा अंदाज आहे. मागील दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये व्यस्त आहे. याच काळात सतर्कता बाळगून जिल्हा प्रशासनाने खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. हवामान खात्याने यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेतकरी खरीप हंगामातील पूर्व मशागतीची कामे करण्यात व्यस्त आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कृषी विभाग देखील खरिपासाठी सतर्क झाला आहे.

खरिपाच्या विविध वाणांचे ६४ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. तब्बल तीन लाख टन खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यापैकी सव्वादोन लाख टन खतांचा पुरवठा झाला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय एक पथक स्थापन करण्यात आले. त्याचप्रमाणे १४ तालुक्‍यांत तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येकी एक पथक स्थापन करण्यात आले आहे.
 

पथके देतील अहवाल
जिल्ह्यात बियाणे, खतांचा काळाबाजार रोखण्यावर नियुक्त केलेली पथके लक्ष ठेवून असतील. तपासणीत काही गैरप्रकार आढळल्यास तालुकास्तरीय भरारी पथक संबंधित अहवाल जिल्हास्तरीय पथकाकडे पाठविणार आहे. अहवालात तथ्य आढळल्यास परवाना रद्द करण्याबरोबरच फौजदारी गुन्हे देखील दाखल होणार आहे. सामान्य नागरिकही पुराव्यानिशी पथकाकडे तक्रार नोंद करु शकतील.


इतर ताज्या घडामोडी
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...
अकोटमध्ये अतिवृष्टीने कपाशी पाण्याखालीअकोला ः आजवर झालेल्या सततच्या पावसाने अकोट...
बुलडाण्यातील नुकसानीचे पंचनामे करून...बुलडाणा : पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे...
सातगाव पठारावर नुकसानग्रस्त बटाट्याचे...पुणे :‘‘लांबलेला मॉन्सून, सततचा कोसळणारा वादळी...
गाव पातळीवरील बैठका, सभा तात्पुरती...अकोला ः कोवीड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे गाव...
नोकर भरतीची वयोमर्यादा वाढवाः...चंद्रपूर : कोरोना संकटामुळे या वर्षात नोकरीकरता...
लातूर, उस्मानाबादेत एक लाख ४१ हजार...उस्मानाबाद / लातूर : लातूर व उस्मानाबाद...
औरंगाबाद, जालन्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड...
मजुरांना कष्टाचे तरी पैसे मिळावेत नगर ः राज्यातील साखर कारखान्यांची तब्बल ८० हजार...
पोषक चाऱ्यासाठी ओट लागवडजनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अधिक पोषणमूल्य...
राज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये  नगर येथील...
कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजनकोरडवाहू  भागातील जमिनीतील ओलावा हा...
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...
मानवी आहारासाठी पोषणयुक्त जैवसंपृक्त वाणजैवसंपृक्त पिकांची लागवड केल्यास पौष्टिक व...
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...