Farming Agricultural News Update Marathi weather update Pune Maharashtra | Agrowon

राज्यात उष्ण, कोरड्या हवामानाचा अंदाज 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 एप्रिल 2020

पुणे : राज्याच्या विविध भागांत पडत असलेला पूर्वमोसमी पाऊस आता थांबला आहे. आजपासून राज्यात मुख्यत: उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका वाढणार आहे. बुधवारी (ता.२२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नांदेड येथे देशातील उच्चांकी ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  पूर्वमोसमी पावसाचे ढग, वाहणारे वारे यामुळे उन्हाचा चटका कमी अधिक होत आहे.

पुणे : राज्याच्या विविध भागांत पडत असलेला पूर्वमोसमी पाऊस आता थांबला आहे. आजपासून राज्यात मुख्यत: उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका वाढणार आहे. बुधवारी (ता.२२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नांदेड येथे देशातील उच्चांकी ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 
पूर्वमोसमी पावसाचे ढग, वाहणारे वारे यामुळे उन्हाचा चटका कमी अधिक होत आहे.

बुधवारी (ता.२२) मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, मालेगाव, सोलापूर, मराठवाड्यातील नांदेडसह परभणी विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशीम, वर्धा येथे तापमानाचा पारा चाळिशीपुढे गेला आहे. वाशीम, वर्धा येथेही तापमान ४२ अंशांपेक्षा अधिक आहे. पावसाची उघडीप, निरभ्र आकाश यामुळे उन्हाचा ताप वाढणार आहे. आज (ता. २३) विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणांचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.१, जळगाव ४१.०, धुळे ४१.२, कोल्हापूर ३४.९, महाबळेश्‍वर ३१.६, मालेगाव ४१.६, नाशिक ३७.१, निफाड ३७.०, सांगली ३७.९, सातारा ३८.४, सोलापूर ४०.५, डहाणू ३५.५, सांताक्रूझ ३४.३, रत्नागिरी ३४.०, औरंगाबाद ३९.०, परभणी ४१.८, नांदेड ४२.५, अकोला ४१.८, अमरावती ४०.६, बुलडाणा ३९.५, ब्रह्मपुरी ४१.०, चंद्रपूर ४०.५, गोंदिया ४०.२, नागपूर ४१.९, वाशीम ४२.०, वर्धा ४२.०. 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
सुपारी फळगळीचे संकटसिंधुदुर्ग: मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ...
कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यतापुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही...
कांदा निर्यातबंदीविरोधात मराठवाड्यातही...औरंगाबाद/परभणी: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी...
निर्यातबंदीमुळे कांदा दरात मोठी घसरणनाशिक: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा...
कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिक...नाशिक: प्रतिकूल हवामान, वाढलेला उत्पादन खर्च व...
‘स्मार्ट’च्या २८ पथदर्शक प्रकल्पांना...पुणे: कृषी खात्याच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पातून...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष फळ छाटणी...सांगली ः जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
राज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे ...पुणे: केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...