कृषीमालाच्या चांगल्या दरासाठी गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करा - तोमर

भारतीय कृषी उत्पादनांची गुणवत्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी काळजीचा विषय राहिल्याचं सांगताना तोमर यांनी कृषी (Agriculture) उत्पादन वाढीतील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या योगदानाचाही गौरव केला आहे.
 Focus on quality of agricultural produce to get good price, says Narendra Singh Tomar
Focus on quality of agricultural produce to get good price, says Narendra Singh Tomar

शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाला चांगला दर हवा असेल तर त्यांनी उत्पादनाच्या गुणवत्तेची काळजी घ्यायला हवी, असं प्रतिपादन नुकतंच केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी केलंय.     

भारतीय कृषी (Indian Agriculture)  संशोधन परिषदेच्या (ICAR) ९३ व्या वार्षिक महासभेत तोमर बोलत होते. तोमर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशातील शेतकऱ्यांना नेहमीच पाठबळ दिलेलं आहे. जागतिक बाजाराशी ( world Market) स्पर्धा करण्यासाठी केंद्र सरकारने ( Central Minister) शेतकरी ( farmer) आणि कृषी संशोधकांना  प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा परिणाम म्हणून भारताच्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीत वाढ होताना दिसत आहे. 

भारतीय कृषी उत्पादनांची गुणवत्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी काळजीचा विषय राहिल्याचं सांगताना तोमर यांनी कृषी (Agriculture) उत्पादन वाढीतील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या योगदानाचाही गौरव केला आहे.     

कृषी क्षेत्रातील संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाच्या माध्यमातून भारतीय कृषी संशोधन परिषदेने देशाची खाद्य व पोषक घटकांची गरज भागवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. देशातील गरज भागवण्यासोबतच जगातील अनेक देशांची मागणी पूर करण्याचं काम भारतीय कृषी क्षेत्राकडून होत आहे. 

काही कृषी उत्पादनात भारत आजमितीस पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर आहे. आजमितीस भारत कृषी उत्पादनांची मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. त्यामुळेच भारतीय कृषी उत्पादनांची गुणवत्ता अव्वल असायला हवी. गुणवत्तेबाबत भारतीय उत्पादनांबद्दल जगभरात विश्वासार्हता निर्माण करायला हवी, असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनांना चांगला भाव मिळवायचा असेल तर आपल्या उत्पादनाचा दर्जा वाढवण्यावर भर देण्याची गरज असल्याचंही तोमर यांनी नमूद केलंय. 

व्हिडिओ पाहा 

२०२९ साली भारतीय कृषी संशोधन परिषदेला १०० वर्षे होणार आहेत. संस्थेने आपला शताब्दी महोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करावा, त्यासाठीची पूर्वतयारी करण्याचे आवाहन तोमर यांनी यावेळी केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com