प्रथिनेयुक्त आहारासाठी खाद्य क्षेत्रातून सोयामीलची मागणी वाढली

खाद्य क्षेत्रातून सोयामीलच्या मागणीला उठाव आहे.प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी ग्राहक सोयामील म्हणजेच सोयाबीनला प्राधान्य देत आहेत. यामुळे खाद्य क्षेत्रातील सोयाबीनचा उठाववाढल्याचे दिसत आहे.
Soymeal
Soymeal

खाद्य क्षेत्रातून सोयामीलच्या (Soymeal) मागणीला उठाव आहे.प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी ग्राहक सोयामील म्हणजेच सोयाबीनला (Soynean) प्राधान्य देत आहेत. यामुळे खाद्य क्षेत्रातील सोयाबीनचा उठाव वाढल्याचे दिसत आहे. बिझनेस लाईनने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. २०२१-२२ या चालू वर्षात (ऑक्टोबर-सप्टेंबर) खाद्य क्षेत्रातून सोयाबीनची मागणी ३३ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (Soybean Prossecers Associaotion of India) म्हणजेच सोपाने वर्तविला आहे. गेल्यावर्षीच्या ६ लाख टनांच्या तुलनेत यंदा सोयाबीनची मागणी ८ लाख टनांवर गेल्याचे सोपाने म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षातील खाद्यतेलाच्या वाढीवरून सोपाने हा अंदाज वर्तवला आहे.

चालू वर्षातील पहिल्या पाच महिन्यात खाद्य क्षेत्रातील सोयाबीनचा वापर अंदाजे ३.४५ लाख टन होण्याचा अंदाज आहे. जो मागील वर्षीच्या २.५५ लाख टनांच्या तुलनेत ३५ टक्के जास्त आहे. सोयाबीन मध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे बरेच लोक सोयाबीनला प्राधान्य देत आहेत. यामुळेच खाद्य क्षेत्रातील मागणी वाढत आहे. आमच्या अपेक्षेनुसार मागणी आणखी वाढणार आहे.  खाद्य क्षेत्रातून सोयाबीनची मागणी वाढविण्यासाठी आम्ही एक जनजागृती कार्यक्रम राबवणार असल्याचेही सोपाचे कार्यकारी संचालक डी. एन. पाठक (D.N Pathak) यांनी सांगितले आहे.  

हेही वाचा - कांद्याविषयी स्थिर आणि ठोस धोरण हवे भारतामध्ये मानवी आहारातील सोयाबीनचा वापर (Soybean Consumption) एकूण उत्पादनाच्या १० टक्के इतका कमी आहे. जनजागृतीनंतर हे प्रमाण वाढेल अशी अपेक्षा पाठक यांनी व्यक्त केली. दरम्यान, ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात सोयापेंडीचे उत्पादन (Soymeal Production) ३७ टक्क्यांनी घटले असून २७.१४ लाख टनांवर आले आहे. मागील वर्षी याच कालावधीत  सोयापेंडीचे उत्पादन ४३.१० लाख टन होते. सोयाबीनचे दर वाढण्याच्या अपेक्षेने शेतकरी टप्प्याटप्प्याने माल विकत आहेत. त्यामुळे बाजारात सोयाबीनची कमी प्रमाणात होणारी आवक सोयापेंडीच्या उत्पादनातील घटीचे प्रमुख कारण आहे. तसेच रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे खाद्यतेल बाजारावर परिणाम झाला आहे.   सोयापेंडच्या वाढलेल्या किमतींमुळे पोल्ट्री उद्योगातील मागणी प्रभावित झाली आहे. ज्यामुळे क्रशिंग कमी झाल्याचे पाठक यांनी सांगितले. मागणी कमी झाल्यामुळे एकूण क्रशिंग ८८ लाख टनापर्यंत घसरेल,असा अंदाज आहे. सोपाने यापूर्वी ९० लाख टनांचा अंदाज व्यक्त केला होता. सध्याची बाजारातील परिस्थिती पाहता या वर्षासाठी सोयाबीन क्रशिंगचा सुधारित अंदाज वर्तवण्यात आल्याचेही पाठक म्हणाले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com