ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शेळी- मेंढी विकास कार्यक्रम महत्तवाचा -केदार  

राज्यात शेळी-मेंढीपालन व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून किफायतशीर ठरलेला आहे. पशुपालन व्यवसाय हा राज्याच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचा घटक आहे कारण राज्यातील ७० टक्के लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे.
Goat-Sheep Development Program
Goat-Sheep Development Program

शेळी-मेंढी विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्राचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण अनिवार्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री (Minister for Animal Husbandry, Dairy Development)सुनील केदार यांनी सांगितले. मंत्रालयात भागभांडवल निधीमधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ प्रक्षेत्राचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरण या विषयावरील आयोजित बैठकीत ते बोलत होते. राज्यात शेळी-मेंढीपालन व्यवसाय हा शेतीला(agriculture) पूरक व्यवसाय म्हणून किफायतशीर ठरलेला आहे. पशुपालन(Animal Husbandry) व्यवसाय हा राज्याच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचा घटक आहे कारण राज्यातील ७० टक्के लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. शेळी-मेंढीपालन व्यवसाय दुष्काळी व निम दुष्काळी भागात करण्यात येत असल्याने शासकीय योजनेचा लाभ उपलब्ध करून देवून या व्यवसायास चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सुनील केदार म्हणाले, महामंडळाचे भागभांडवल ६ कोटी असून रुपये ९४ कोटी प्रस्तावित आहेत. या प्रस्तावित ९४ कोटी निधीमधून महामंडळाच्या प्रक्षेत्राचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये पैदाशीकरिता पायाभूत सुविधा, शेळ्या-मेंढ्यांची खरेदी, नवीन वाडे बांधकाम, शेळ्यांमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रम राबविणे ,मुरघास निर्मिती यंत्रसामग्री खरेदी, शेळी मेंढी पालन प्रशिक्षण केंद्र इमारत बांधकाम, प्रशिक्षणार्थी निवासी इमारत बांधकाम, जमिन विकास, सिंचन सुविधा, ट्रॅक्टर ट्रॉली, कृषी अवजारे खरेदी व चारा कापणी यंत्र, वैरण गोडाऊन, शेळी मेंढी खाद्य कारखाना उभारणी, कार्यालय बांधकाम, कर्मचारी निवासस्थान, प्रक्षेत्रावरील आवश्यक साधनसामग्री, अल्ट्रा सोनोग्राफी मशीन, फिरते शेळी मेंढी चिकित्सालय आदी सुविधा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता, सह सचिव माणिक गुट्टे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शशांक कांबळे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com