सोन्याचे भाव वाढणार

आंतराराष्ट्रीय बाजारात (आणि म्हणून भारतीय बाजारात देखील ) सोन्याचे भाव भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. विविध देशांच्या केंद्रीय बँकांकडे साठलेले डॉलर्स गेली अनेक दशके त्या बँका अमेरिकी सरकारच्या रोख्यांमध्ये गुंतवत आहेत. कारण अमेरिकेचे चलन डॉलर हे जगात एक स्थिर चलन मानले गेले आहे.
Gold rate will goes high
Gold rate will goes high

आंतराराष्ट्रीय बाजारात (आणि म्हणून भारतीय बाजारात देखील ) सोन्याचे भाव भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. विविध देशांच्या केंद्रीय बँकांकडे साठलेले डॉलर्स गेली अनेक दशके त्या बँका अमेरिकी सरकारच्या रोख्यांमध्ये गुंतवत आहेत. कारण अमेरिकेचे चलन डॉलर हे जगात एक स्थिर चलन मानले गेले आहे. परंतु २००८ मधील सबप्राइम अरिष्टानंतर अमेरिकी वित्त प्रणालीबद्दलच्या विश्वासाला पहिला तडा गेला. त्यामुळे केंद्रीय बँकांचा अमेरिकी डॉलरबद्दलचा विश्वास डळमळू लागला. तेव्हापासून अनेक देशांच्या केंद्रीय बँका त्यांच्याकडील परकीय चलनाच्या गंगाजळीतील काही भाग अमेरिकन रोख्यांऐवजी सोन्यात गुंतवू लागल्या आहेत. हेही पाहा -Soybean Price वाढूनही चीनची आयात विक्रमी राहणार दरवर्षी हे प्रमाण वाढत आहे. जगातील सर्व केंद्रीय बँकांकडील एकत्रित सोन्याचे साठे ऐतिहासिक उंचीवर आहेत. रशियाच्या केंद्रीय बँकेने अमेरिकी रोख्यात गुंतवलेले काही शे बिलियन्स डॉलर्स अमेरिकेने गोठवले आहेत. त्यामुळे अनेक देशांच्या केंद्रीय बँकांच्या/ राजकीय नेत्यांच्या मनात पाल चुकचुकली आहे. ‘भविष्यात आपले अमेरिकी सरकरबरोबर काही बिनसले तर अमेरिका केव्हाही आपल्या त्यांच्याकडील गुंतवणुकी गोठवु शकते; पुढे जाऊन आपल्याच गुंतवणुकीचा आपल्या विरुद्ध ब्लॅकमेलसाठी वापर करू शकते' अशी भावना निर्माण झाली आहे.

त्यामुळे सर्वच केंद्रीय बँका सोन्याच्या खरेदीचे प्रमाण वाढवू शकतात, असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. अर्थात त्याचा गाजावाजा केला जाणार नाही. हेही वाचा- डायरियाच्या साथीमुळे पशुधन धोक्यात जगात जेव्हापासून वस्तुविनिमय पध्दत (बार्टर सिस्टीम) जाऊन कोणत्या तरी चलनाचा वापर होऊ लागला तेव्हापासून माणसाच्या पाठीवर बसलेले सोन्याचे भूत शेकडो वर्षे झाली तरी उतरायला काही तयार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com