लोक सहभाग हाच विकासाचा पाया

कुटुंबाचा विकास म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांचा विकास आणि सार्वजनिक संसाधनांचा विकास म्हणजे गावातील उपलब्ध जल, जमीन, जंगल, जनावर आणि ग्रामस्थ यांचा विकास होय.
लोक सहभाग हाच विकासाचा पाया
farm visit on experimental farmers filed

कुटुंबाचा विकास म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांचा विकास आणि सार्वजनिक संसाधनांचा विकास म्हणजे गावातील उपलब्ध जल, जमीन, जंगल, जनावर आणि  ग्रामस्थ यांचा विकास होय. ग्रामीण क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी लोकसहभागातून कामे झाली, त्याचा परिणाम अधिक चांगल्या प्रकारे पाहावयास मिळतो. सामाजिक, आर्थिक आणि भौतिक विकास झाला तरच सर्वांगीण विकास झाला असे आपणास म्हणता येईल. कुटुंबाचा विकास म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांचा विकास आणि सार्वजनिक संसाधनांचा विकास म्हणजे गावातील उपलब्ध जल, जमीन, जंगल, जनावर आणि  ग्रामस्थ यांचा विकास होय. ज्या विकासकामांमध्ये लोकांचा सक्रिय सहभाग दिसतो, ती कामे परिणामकारक होतात. ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल, तर पुढील १५ वर्षांमध्ये खालील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल.  ग्राम विकासाचे धोरण 

  • वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या अडचणीमुळे नैसर्गिक संसाधनाचा विकास होणे गरजेचे आहे. पावसाच्या पाण्याची साठवणूक, व्यवस्थापन व योग्य वापरावर भर द्यावा लागेल.
  • जमिनीची सुपीकता आणि शेतीमालाची गुणवत्ता वाढविण्यासाठी रसायन अवशेषमुक्त शेती व्यवस्थापनाकडे लक्ष दिले पाहिजे. याचबरोबरीने पीक उत्पादकता वाढ, पीक बदल हे देखील महत्त्वाचे मुद्दे आहेत. स्वयंचलित हवामान केंद्राच्या साह्याने पीकनुकसान कमी करणे शक्य आहे. यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा.  
  • शेती विकासाकरिता गावामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून शेतीमालास योग्य दर मिळविण्यासाठी साठवणूक सुविधा, मूल्यवर्धन व बाजारपेठ निर्मितीसाठी भर द्यावा.
  • शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालनावर भर द्यावा. याचबरोबरीने प्रक्रिया उद्योगालाही चालना देण्याची आवश्यकता आहे. 
  • शेतीमालाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामग्री जसे डाळ मिल, राइस मिल, ऑइल मिल, कांदा मिरची/ हळद कांडप यंत्राच्या प्रसारावर भर दिला पाहिजे. गावामध्ये एक व्यवसाय सुरू झाला, की तेथे अनेकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.  
  • कौशल्य विकासावर भर दिल्यास गावामध्ये तरुण मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध करता येईल. यामध्ये इलेक्ट्रिशयन, प्लंबर, नर्स असिस्टंट, गारमेंट, मोबाइल दुरुस्ती, हॉटेल व्यवसाय, वाहतूक व्यवस्था अशा अनेक व्यवसायांना चालना देण्याची गरज आहे.
  • लुपिन फाउंडेशनचा उपक्रम  गेली ३२ वर्षे लुपिन फाउंडेशन ग्रामीण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नऊ राज्यांतील सुमारे ५,४३१ गावांमध्ये कार्यरत आहे.  लोकसहभागातून विविध विकासकामांना संस्थेने चालना दिली आहे. २०१४ मध्ये बुचकेवाडी (ता.जुन्नर, जि. पुणे) येथे संस्थेने नाबार्ड अर्थसाह्याने लोकसहभागातून पाणलोट विकास कार्यक्रम राबविला. संस्थेने शेतकरी प्रोड्यूसर कंपन्यांची स्थापना करून गुणवत्तापूर्ण खते, कीडनाशके, जनावरांच्या खाद्याचा शेतकऱ्यांना स्वस्त दरात पुरवठा केला जातो. शेतीमालास योग्य दर मिळविण्यासाठी शेतकरी कंपनीमार्फत विविध व्यवसाय सुरू करण्यात येत आहेत.      - व्यंकटेश शेटे, ९७६४००३७३६ (प्रकल्प व्यवस्थापक, लुपिन फाउंडेशन, पुणे)

    Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

    ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.