प्रत्येक कुटुंब अन ्गाव आत्मनिर्भर करण्याचा ध्यास

ध्यास, प्रयत्न, चिकाटीचा संगम झाल्याने हस्ता गावाची शाश्‍वत विकास आणि गावातील प्रत्येक कुटुंब आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
प्रत्येक कुटुंब अन ्गाव आत्मनिर्भर करण्याचा ध्यास
watershed development work

ध्यास, प्रयत्न, चिकाटीचा संगम झाल्याने हस्ता गावाची शाश्‍वत विकास आणि गावातील प्रत्येक कुटुंब आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील अतिशय प्रयोगशील हस्ता गाव. या गावची लोकसंख्या सुमारे २३०० च्या आसपास. गावात ग्रामपंचायतीसाठी सरपंचासह दहा सदस्य निवडले जातात. नियोजनपूर्वक कामाचा ध्यास घेत एकीने प्रयत्न व चिकाटीची जोड देत ग्रामस्थ २०१२ मध्ये एकत्र आले, ते त्या वेळी निवडलेल्या सदस्यातून सरपंच झालेल्या मनोहर निळ यांच्या नेतृत्वात. पहिल्या पाच वर्षांच्या कालावधीतच त्यांनी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि शासनाच्या मदतीने ग्रामविकासाची पायाभरणी केली. कालबद्ध कार्यक्रम आखला. गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्याच्या हाताला गावात काम मिळावे, ते जे काम करतील त्याचा त्यांना मोबदला मिळावा, कुटुंबातील प्रत्येक जण आनंदी जीवन जगला पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वाटचाल सुरू केली.  कृषी विभाग, नाबार्ड, जिल्हा परिषदेचा पंचायत विभाग, लुपिन फाउंडेशन आदींच्या सहकार्याला ग्रामस्थांचा लोकसहभाग, श्रमदानाची जोड देऊन, कृषी, शिक्षण, आरोग्य, वनविकास, जलसंधारण, सूक्ष्म सिंचन, पूरक उद्योग आदींच्या माध्यमांतून गावकऱ्यांना शाश्‍वत उत्पन्न मिळवून देण्यात ग्रामपंचायतीला यश आले आहे. मनोहर निळ यांनी पाच वर्षांत सरपंच म्हणून मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे ग्रामस्थांनी २०१७ मध्ये ग्रामपंचायत बीनविरोध केली आणि त्यांच्या पत्नी वंदना मनोहर निळ यांना सरपंचपदी निवडले. वंदनाताईंनी पतीकडून मिळालेला जनसेवेचा वारसा २०१७ पासून अविरत सुरू ठेवला. लुपीन फाउंडेशन व नाबार्डच्या सहकार्यातून अलीकडेच गावात शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात आली आहे. गावचे उपसरपंच तथा प्रयोगशील शेतकरी सर्जेराव आव्हाळे शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष आहेत. १५ मुख्य व जवळपास १५० वर भागधारक असलेल्या या कंपनीने प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष केंद्रीत करून शेतकऱ्यांना थेट बाजापेठेशी जोडले आहे.  

- सौ. वंदना मनोहर निळ,९८२२११११०५  (सरपंच,  हस्ता, ता. कन्नड, जि. औरंगाबाद)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com