गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्न

लोकसहभागातून गावाच्‍या संपूर्ण विकासाचा अजेंडा आम्ही राबवत आहोत. आजवर अनेक कामे पूर्णत्वास नेली. आणखी काही कामे करायची आहेत. त्याचा शासनाच्या पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे विविध उपक्रम सुरू आहेत.
गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्न
animal vaccination programme in village

तीन वर्षांपासून मनारखेड गावाचे सरपंचपद सांभाळत आहे. लोकसहभागातून गावाच्‍या संपूर्ण विकासाचा अजेंडा आम्ही राबवत आहोत. आजवर अनेक कामे पूर्णत्वास नेली. आणखी काही कामे करायची आहेत. त्याचा शासनाच्या पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे विविध उपक्रम सुरू आहेत.   ग्रामपंचायतीची सूत्रे हाती घेतल्यानंतर टप्प्याटप्प्याने विकासाचा आराखडा राबविण्यास प्राधान्य दिले. ग्रामस्थांची गरज लक्षात घेऊन गावामध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसविले. गावातील अंगणवाडी आणि संपूर्ण शाळा डिजिटल केली. शाळेची दुरुस्ती केली. शाळेच्या संपूर्ण परिसरात पेव्हर ब्लॉक बसविले. अंगणवाडीची दुरुस्ती आणि रंगरंगोटी केली. शाळेमध्ये मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. महिला बचत गटांसाठी गावामध्ये कार्यालय उभारले आहे. विविध निधींतून गावात एक कोटींचे रस्ते तयार केले. संजय गांधी श्रावण बाळ योजनेचा लाभ गावातील ९० टक्के लाभार्थ्यांना मिळवून दिला. माझ्या वडिलांनी झोपडपट्टी पुर्न विकासासाठी एक एकर आणि गावात पाण्याची टाकी उभी करण्यासाठी आईने एक एकर जमीन दान दिली. गावातील हनुमान मंदिर परिसर, स्मशानभूमी, समाज मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसविले. गावातील चार सार्वजनिक चौकात नागरिकांना बसण्यासाठी बेंन्च बसविलेले आहेत. गावात हायमास्ट लाइट लावण्यात आले. अंतर्गत रस्त्यामध्ये कुठेही पाणी अडणार नाही, डबके साचणार नाही यासाठी मुरूम टाकला आहे. ग्रामपंचायत कार्यालयाचे नूतनीकरण केले आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत घरोघरी मास्क, सॅनिटायझर, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. अपंग व्यक्तींच्या खात्यामध्ये या काळात प्रत्येकी २५०० रुपये जमा केले. गावामध्ये डेंगी, मलेरियाच्या नियंत्रणासाठी नियमित फॉगिंग यंत्राद्वारे धूर फवारणी केली जाते. कोरोना काळात गावात प्रत्येक आठवड्यात सॅनिटायझर फवारणी केली.  गावातील गरीब होतकरू विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे राहू नये यासाठी त्यांना ग्रामपंचायत कार्यालयातील वाचनालयात स्पर्धा परीक्षा पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. जिल्हा परिषद शाळा, नवोदयसाठी विद्यार्थी प्रवेश प्राप्त व्हावे यासाठी त्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले डाते, तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यात येते. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी रस्त्याच्या दुतर्फा ट्री गार्ड लावून झाडे जगवली आहेत. मागेल त्याला शोषखड्डा देण्याचा अभिनव उपक्रम राबवून सांडपाणी जमिनीत मुरेल याची खास दक्षता घेतली जात आहे. रस्त्याच्या दुतर्फा कचराकुंडी लावण्यात आल्या. गाव परिसरातील गवत कापण्यासाठी आणि  वृक्षारोपणासाठी खड्डे करणारे यंत्रसुद्धा आणले. जनावरांतील लम्पी या त्वचा आजाराच्या नियंत्रणासाठी गावामध्ये लशीकरणाची मोहीम राबविण्यात आली. शेतामध्ये कीडनाशकांची फवारणी करताना निष्काळजीपणा होतो. पर्यायाने शेतकरी, शेतमजुरांचे नुकसान होते. यासाठी सातत्याने प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात. कपाशीवरील बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागातर्फे सातत्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. येत्या काळात ग्रामपंचायतीतर्फे शेतरस्त्यांची कामे सुरू होत आहेत.

- सरपंच ः डॉ. सूरज पाटील ९९६०२९९१६२ (गाव ः मनारखेड, ता. बाळापूर, जि. अकोला.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.