
ब्रम्हपुरी ग्रामपंचायतीला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे.ग्रामपंचायतीने पाच रुपयात २० लिटर शुद्ध पाणी देण्याची सोय केली आहे. गावाने स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे.
सोलापूर- मंगळवेढा रस्त्यावर भीमा नदीकाठी ब्रम्हपुरी हे सुमारे ३३०० लोकवस्तीचे गाव आहे. मंगळवेढ्यापासून फक्त १४ किलोमीटरवरील असलेल्या या गावाला ऐतिहासिक पंरपरा आहे. प्रमुख रस्त्यावरील गाव असल्याने आणि या भागातील आठ-दहा गावाचं प्रमुख केंद्र म्हणूनही ब्रम्हपुरीची ओळख आहे. तीन वर्षापूर्वी मी ग्रामपंचायतीचा पदभार घेतला. तेव्हापासून गावाचा विकास हाच एकमेव अजेंडा आम्ही राबविला आहे. ग्रामपंचायतीला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे. याचबरोबरीने अंगणवाड्या आणि शाळांनाही हे प्रमाणपत्र मिळाले आहे. आता शाळाही डिजिटल केली आहे. आम्ही पहिल्यांदा २०१७-१८ मध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प उभा केला. ग्रामपंचायतीने पाच रुपयात २० लिटर शुद्ध पाणी देण्याची सोय केली आहे. गावाने स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. निर्मलग्राम योजनेतून गावात हागणदारीमुक्त गावासाठी प्रयत्न केले. आज गावातील सर्वच्या सर्व ५३८ कुटुंबाकडे स्वच्छतागृहे आहेत. तसेच गाव हागणदारीमुक्त झाले आहे. तसेच भूमिगत गटार योजनाही राबवली. त्यामुळे उघड्यावर कोठेच गटार राहिली नाही. गावात पुरातन हनुमान मंदिर आहे. सदर देवस्थानास तीर्थक्षेत्राचा क वर्ग दर्जा मिळवला आहे. या योजनेतूनही मंदिराच्या परिसराचा विकास करण्यात आला आहे. तसेच गावच्या प्रमुख रस्त्यावर १८ ठिकाणी सौरदिवे लावले आहेत. रस्ते, वीज आणि पाणी हे आमचे प्रमुख विषय आहेत. याचबरोबरीने स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, महिला आणि बालकांसाठी विशेष उपक्रमही आम्ही राबवितो. गावच्या सांडपाण्यावर ऊसशेती गावात भूमिगत गटाराची योजना आहे. गावातील सांडपाणी या गटारातील पाइपद्वारे गावठाणात सोडले जात होते. पण याच पाण्याचा उपयोग करून घेण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीच्या जवळपास पाऊण एकर क्षेत्रावर ऊस करण्याचा निर्णय घेतला. त्यातून गेल्या काही वर्षात जवळपास २ लाख ६१ हजार ७८९ रुपयांचे उत्पन्न या ऊसशेतीतून मिळाले.
विविध पुरस्कारावर मोहोर
- मनोज पुजारी,७५५८२३९५८५ ( सरपंच,ब्रम्हपुरी,ता.मंगळवेढा,जि.सोलापूर)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.