जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मात

आजही माण, खटाव हे दुष्काळी तालुका म्हणून ओळखले जातात. परंतू आता या तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारण मोहीम उपयुक्त ठरली.
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मात
watershed development work

आजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून ओळखले जातात. परंतू आता या तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारण मोहीम उपयुक्त ठरली. खटाव तालुक्यातील अनेक गावांनी या मोहिमेतून पाणी समस्येवर कायमस्वरूपी मात केली आहे. जाखणगाव, गादेवाडी, आमलेवाडी, साळुखेवस्ती, रामोशीवस्ती (मेघलदरे वाडी) या गावांनी गेल्या काही वर्षांपासून जलसंधारण व मृद्संधारण कामांची परिणामकारक अंमलबजावणी करत टँकरमुक्ती बरोबर  वनसंपत्तीही मोठ्या प्रमाणात निर्माण केली. जांबपासून ते खटावपर्यंत शासन, लोकसहभाग, विविध सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून काही वर्षापासून जलसंधारणाची चळवळ राबवली. गावशिवारातील ओढ्यांवर सिमेंट व मातीचे लहानमोठे ४१ बंधारे बांधण्यात आले. त्याबरोबरच ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. या कामातून एक लाख ८० हजार घनमीटर गाळ पडीक जमिनीवर पसरण्यात आला. काठावरील माती पुन्हा ओढ्यात वाहून जाऊ नये म्हणून सुमारे चार वर्षापूर्वी गावकऱ्यांनी अत्यंत कल्पकतेने दोन्ही बाजूला बांबूची रोपे लावली. या रोपांचे मोठ्या बेटात रूपांतर झाले आहे. भविष्यात या बांबूपासून चांगले उत्पन्न मिळणार आहे. गाव परिसरात ४१ बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवण्यात आले. या गावांमध्ये जलसंधारण व मृद्संधारणाची कामे शास्त्रोक्त पद्धतीने झाल्याने बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर होणार आहे.  सर्व बंधाऱ्यामध्ये अंदाजे १८० टी.सी.एम पाणी साठू शकते असे कृषी अधिकारी किरण काळे यांनी सांगितले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.