स्वच्छ, सुंदर स्मशानभूमीसाठी ग्रामस्थ आले एकत्र

आव्हई (ता.पूर्णा, जि. परभणी) येथील ग्रामस्थ स्वच्छ आणि सुंदर स्मशानभूमीसाठी एकत्र आले आहेत. कृषिभूषण सूर्यकांतराव देशमुख-झरीकर यांचे स्वच्छ आणि सुंदर स्मशानभूमी अभियान आणि झेडपीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या वृक्षवल्ली फाउंडेशनच्या माध्यमातून या उपक्रमाने गती घेतली आहे.
The villagers came together for a clean, beautiful cemetery
The villagers came together for a clean, beautiful cemetery

परभणी : जिल्ह्यातील आव्हई (ता.पूर्णा) येथील ग्रामस्थ स्वच्छ आणि सुंदर स्मशानभूमीसाठी एकत्र आले आहेत. कृषिभूषण सूर्यकांतराव देशमुख-झरीकर यांचे स्वच्छ आणि सुंदर स्मशानभूमी अभियान आणि जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या वृक्षवल्ली फाउंडेशनच्या माध्यमातून या उपक्रमाने जिल्ह्यामध्ये गती घेतली आहे. अनेक गावामध्ये अभियानाला चांगली सुरवात झाली आहे. आव्हई येथील येथे स्मशानभूमीची मोठी जागा असून बाजूलाच तलाव आहे. मात्र ही जागा उकिरडे आणि वेड्या बाभळींनी वेढली आहे. मात्र झरी, खांबेगाव, पोखर्णी आणि देऊळगाव दुधाटे या स्मशानभूमीचा आदर्श घेऊन गावकऱ्यांनी या जागेवरील सर्व बोरी बाभळी काढून विविध उपयुक्त झाडे लावून सुशोभित करायचा संकल्प केला आहे. ग्रामपंचायतीचे प्रशासक प्रभाकर भोसले, मुख्याध्यापक प्रल्हाद कऱ्हाळे, ग्रामगीतेचे अभ्यासक डॉ. दिलीप शृंगारपुतळे यांनी या उपक्रमासाठी मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार यंत्रणेच्या साहाय्याने झाडे,झुडपे खोदून काढण्यात आली.स्वच्छ आणि सुंदर स्मशानभूमीचा आराखडा तयार करून वृक्षवल्ली फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याठिकाणी स्मृती उद्यान आणि स्वच्छ आणि सुंदर स्मशानभूमी लवकरच उभारण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com