Calf Care : तापमानवाढीत लहान वासरांची काळजी घ्या

Animal Care : लहान वासरांची प्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे विविध आजारांना बळी पडतात. त्यामध्ये हगवणीचा समावेश होतो.
Calf Care
Calf CareAgrowon

डॉ.एस.टी.बोरीकर

Animal Health Update : लहान वासरांची प्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे विविध आजारांना बळी पडतात. त्यामध्ये हगवणीचा समावेश होतो. साधारणतः एक ते तीन महिन्यापर्यंतची वासरे हगवणीने जास्त प्रमाणात बाधित होतात.

हगवण साधारणपणे जिवाणूंमुळे, तसेच विषाणू किंवा पोटातील जंतांमुळे होते. हगवणीमुळे वासरू अशक्त होते, त्याची वाढ खुंटते, डोळे खोल जातात, वजन कमी होते आणि काही वेळा ते मृत्युमुखी पडते. पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे या आजारावर तातडीने उपाय योजना करावी.

१) कोलाय ब्यासिलोसिस किंवा पांढरी हगवण हा वासरांना अधिक प्रमाणात आढळणारा आजार आहे. रोगकारक जंतू ई. कोलाय हे बऱ्याच वेळेला लहान आतड्यामध्ये नेहमीच असतात, परंतु त्यांना जेव्हा पोषक वातावरण मिळते तेव्हा ते शरीरात रोग निर्माण करतात.

२) पांढऱ्या हगवणीमुळे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण लहान वासरांमध्ये दोन ते पन्नास टक्क्यांपर्यंत असू शकते. हगवणीची इतरही काही कारणे असू शकतात, जसे की दुधाचे सेवन जास्त प्रमाणात केल्यामुळे किंवा नवजात वासराला चीक कमी पाजल्यामुळे देखील हगवण लागते.

Calf Care
Animal Care : वाढलेल्या खुरांमुळे जनावरांवर काय परिणाम होतात?

३) गोठ्यातील अस्वच्छता, विपरीत हवामान, तसेच जनावरांच्या शरीरावरील ताण ही कारणे देखील वासराला हगवणीसाठी कारणीभूत असू शकतात. काही वेळा लहान वासरांना जंतामुळे हगवण होते.

४) जंताचा प्रादुर्भाव गाईकडून वासराला होतो. त्यामुळे लहान वासराची विष्ठा तपासणी तसेच गाईला गर्भधारणेपूर्वीच जंतनाशके देणे फायदेशीर ठरते.

५) नवजात वासराला जन्मल्यानंतर एक तासाच्या आत त्याच्या आईचा चीक मिळणे अत्यावश्यक आहे. याचे कारण असे की आईच्या चिकामध्ये वासरासाठी रोगप्रतिकारक शक्ती असते आणि वासरू जन्मल्यानंतर लगेचच वासराचे आतडे ही रोगप्रतिकारक शक्ती शोषून घेण्यास तत्पर असते. त्यामुळे जेवढ्या लवकर वासराला त्याच्या आईचा चीक मिळेल तेवढा त्याला अधिक फायदा होतो. साधारणतः वासराच्या वजनाच्या दहा टक्के एवढा चीक त्याला पाजावा.

६) आपल्या गोठ्यामध्ये एखादे वासरू हगवणीने आजारी आहे असे आढळले तर त्याला इतर वासरांपासून ताबडतोब वेगळे करावे. वेगळे केले नाही तर त्यापासून इतर वासरांना हगवण होऊ शकते. ७) आजारी जनावराला ताबडतोब पशुवैद्यकाच्या साहाय्याने इलाज करून घ्यावा, तसेच त्याला तोंडाद्वारे जलसंजीवनी द्यावी. आजचे वासरू उद्याचे मोठे जनावर आहे हे लक्षात घेऊन योग्य ती काळजी वेळेत घेतल्यास आपले आर्थिक नुकसान टाळता येते.

संपर्क - डॉ.एस.टी.बोरीकर , ९६०४०६१९४७, (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय,शिरवळ, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com