How to Identify Hen Is Ready to Lay Eggs?
How to Identify Hen Is Ready to Lay Eggs?

खुडूक कोंबडी कशी ओळखावी?

डीप लिटर म्हणजेच गादी पद्धतीमध्ये कोंबडी १८ ते २० आठवड्यांची झाल्यावर अंडी द्यायला सुरुवात करते.अंडी उत्पादन देणाऱ्या कोंबड्या वर्षभरात साधारणतः २८० ते ३१० अंडी देत असतात. कोंबड्यांची अंडी देण्याची क्षमता त्यांच्या प्रजातीवर अवलंबून असते.

अंडी उत्पादन देणाऱ्या कोंबड्या वर्षभरात साधारणतः २८० ते ३१० अंडी देत असतात. कोंबड्यांची अंडी देण्याची क्षमता त्यांच्या प्रजातीवर अवलंबून असते. गावाकडे अंडी देणाऱ्या कोंबडीला खुडूकावरची कोंबडी असं म्हंटल जातं. संगोपनातील कमतरता, हाताळणी, इतर बाबीमुळे येणारा ताण, जंत प्रादुर्भाव, आजाराची बाधा यामुळे कोंबड्यांची उत्पादनक्षमता कमी होते. डीप लिटर (deep liter) म्हणजेच गादी पद्धतीमध्ये कोंबडी १८ ते २० आठवड्यांची झाल्यावर अंडी द्यायला सुरुवात करते. ३० ते ३१ आठवड्याची असतना कोंबडी सर्वाधिक अंडी देते कोंबडीची अंडी (eggs) देण्याची क्षमता ७२ आठवड्यापर्यंत टिकून राहते.

- अंडी देणाऱ्या कोंबडीचे वजन कमी असते.

- अंडी देणारी कोंबडी चंचल असते.सतत फिरत असते.

- पक्षाचे वय ४० आठवडे असताना कोंबडीची चोच निमुळती होते.

- तुरा गोल, होऊन त्यावर चकाकी येते.

- अंडी देणारी कोंबडी मेटीगसाठी तारांवर, भिंतीवर, घरट्यामध्ये वेगळे जाऊन बसतात.

- या कोंबड्या सारख्या आवाज करत असतात, इतर कोंबड्यामध्ये मिसळत नाहीत.

- अंडी देत असल्यानं शरीरात कॅल्शियमची उणीव निर्माण होऊन पिसे गळून पडल्याने पोटावर ब्रुडीपॅच तयार होतो.

- अंडी देण्याच्या वयात ज्या कोंबड्या अंडी देत नाहीत, त्यांच्या शरीरावरची पिसे स्वच्छ आणि चांगली दिसून येतात.

- अनुत्पादक खुडूक पक्षांचे ‘पेलव्हिक बोन’ मधील अंतर दोन बोटाएवढे असते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com