अॅग्रोवन स्मार्ट शेतकरी पुरस्कार २०१९ विजेते मान्यवर
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019पुणे : ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाची किमया शर्मा यांनी साधली आहे. पुण्याच्या बालगंधर्व नाट्यमंदिरात कौतुकाच्या शब्दसुमनांचा वर्षाव आणि टाळ्यांच्या गजरात त्यांना प्रख्यात ग्रामीण साहित्यिक डॉ. राजन गवस व ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
पुणे : ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाची किमया शर्मा यांनी साधली आहे. पुण्याच्या बालगंधर्व नाट्यमंदिरात कौतुकाच्या शब्दसुमनांचा वर्षाव आणि टाळ्यांच्या गजरात त्यांना प्रख्यात ग्रामीण साहित्यिक डॉ. राजन गवस व ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. या वेळी पुरस्कारर्थी ठरलेल्या सर्व बहाद्दर शेतकऱ्यांच्या कर्तृत्वाला संगीत आणि नृत्याच्या तुफानी जल्लोषात अनोखी सलामी दिली गेली.
स्मार्ट शेतकरी पुरस्काराचे मानकरी
अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी- सुभाष शर्मा (मु. पो. छोटी गुजरी, ता. जि. यवतमाळ), अॅग्रोवन स्मार्ट महिला शेतकरी- विजया रवींद्रराव गुळभिले (दीपेवडगाव, केज, बीड), अॅग्रोवन स्मार्ट सेंद्रिय शेती- शामसुंदर सुभाष जायगुडे (केळवडे, भोर, पुणे), अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक- तात्यासाहेब रामचंद्र फडतरे (रामवाडी, इंदापूर, पुणे), अॅग्रोवन प्रेरणा पुरस्कार- वैशाली सुधाकर येडे (राजूर, कळम, यवतमाळ), अॅग्रोवन स्मार्ट कृषिपूरक व्यवसाय- उत्तम लक्ष्मण डुकरे (औरंगपूर, जुन्नर, पुणे), अॅग्रोवन स्मार्ट संशोधक- पंढरीनाथ सर्जेराव मोरे (सांगवी भुसार, कोपरगाव, अहमदनगर), अॅग्रोवन स्मार्ट जलव्यवस्थापक शेतकरी- डॉ. दत्तात्रय सहदेव वणे - (मानोरी, राहुरी, नगर) अॅग्रोवन पश्चिम महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी- प्रताप रघुनाथ चिपळूणकर, (शाहूपुरी, कोल्हापूर), अॅग्रोवन उत्तर महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी- प्रशांत वसंत महाजन (तांदलवाडी, रावेर, जळगाव), अॅग्रोवन कोकणचा स्मार्ट शेतकरी- अनिल नारायण पाटील (सांगे, वाडा, पालघर), अॅग्रोवन मराठवाड्याचा स्मार्ट शेतकरी- राजेश मुरलीधर पाटील (निपाणी, कळंब, उस्मानाबाद), अॅग्रोवन विदर्भाचा स्मार्ट शेतकरी- अविनाश बबनराव कहाते (रोहणा, आर्वी, वर्धा)