सरकार इथेनॉल निर्मितीसाठी पुढाकार घेणार

केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी द्रुतगतीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मे अखेर देशातील ७१ नव्या इथेनॉल प्रकल्पांना तत्त्वतः मंजुरी दिली आहे.
सरकार इथेनॉल निर्मितीसाठी पुढाकार घेणार
Ethanol agrowon
Published on

केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी द्रुतगतीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मे अखेर देशातील ७१ नव्या इथेनॉल प्रकल्पांना तत्त्वतः मंजुरी दिली आहे.

‘इंटरेस्ट सबव्हेन्शन’ या योजनेअंतर्गत या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. योजनांची उत्पादन क्षमता ३९७ कोटी लिटर इतकी असेल.

सध्या संपणारा ऊस हंगाम व चार महिन्यांत सुरू होणारा नवीन ऊस हंगाम या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने साखर उद्योगाशी निगडित विविध निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या २१ एप्रिल २०२२ ला सरकारने खाद्य विभागामार्फत एक खिडकी योजना सुरू करून याद्वारे जलद गतीने नव्या इथेनॉल प्रकल्पांना मंजुरी देण्यास सुरुवात केली होती.

इंधन दर वाढीमुळे टीकेचा लक्ष्य बनलेल्या केंद्र सरकारने पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जोरदार पावले उचलली आहेत. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे पर्याय वाढवण्यासाठी पुरेशी इथेनॉलनिर्मिती व्हावी यासाठी केंद्राने वेगवान पद्धतीने हालचाली सुरू केल्या आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com