मराठवाड्यात कपाशी उलंगवाडीच्या उंबरठ्यावर

सततचा पाऊस, पडलेली धुई व पोषक नसलेल्या वातावरणामुळे शेतात यंदा दुसऱ्या वेचणीतच कपाशीचा गाशा गुंडाळल्याचे चित्र आहे. उत्पादनही एकरी ते चार ते सहा क्‍विंटलपुढे नाही. - दीपक बुनगे, शेतकरी, रामगव्हाण, जि. जालना पाच एकरांत २२ क्‍विंटल कापूस झाला. पावसात भिजल्यानं फुटलेल्या कापसाला कोंब आले होते. चार पाच व्यापारी पाहून गेले, पण कुणी अजून घेतला नाही. कसा घ्यावा हा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. सर्वच शेतकऱ्यांची ही परिस्थिती आहे. - गजानन पाटील, शेतकरी तिडका, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद. दीड एकरात कापूस लावला त्यात जवळपास महिनाभर लागून बसलेल्या पावसानं मोठे नुकसान केलं. पहिली वेचणी आता करतोय, दुसरी होईल की नाही शक्‍यता नाही. - भीमराव खरात, वाग्रुळ जहाँगीर, जि. जालना. संकटातील कपाशीवर आता गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव १० ते १२ टक्क्‍यांपर्यंत दिसून येत आहे. आत्तापर्यंत नुकसान झालं म्हणून शेतकऱ्यांनी फरदड घेण्याचा प्रयत्न करू नये, त्यामुळे गुलाबी बोंड अळी पुढल्या हंगामात मोठ्या प्रमाणात येऊ शकते. - अजय मिटकरी, कीटकशास्त्रज्ञ,केव्हीके खरपुडी, जि. जालना. आहे तो कापूस वेचून घ्यावा. बोंडांची संख्या झाडावर नसल्यास लागलीच कपाशी काढावी. बोंड असल्यास संरक्षित सिंचन द्यावे; परंतु डिसेंबरअखेरपर्यंत कपाशी काढून घ्यावी. पाण्याच्या उपलब्धतेनुसार उन्हाळी पिकांचा विचार शेतकऱ्यांना करता येईल. - डॉ. किशोर झाडे, विषय विशेषज्ञ
cotten on the threshold of  ulangwadi In the Marathwada
cotten on the threshold of ulangwadi In the Marathwada

औरंगाबाद : शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असलेल्या मराठवाड्यातील पांढऱ्या सोन्याच्या क्षेत्राला यंदा ग्रहण लागले आहे. किमान चार ते पाच वेचण्या व किमान आठ ते दहा क्‍विंटल एकरी उत्पादन होणारी कपाशी दुसऱ्या वेचणीतच उलंगवाडीच्या उंबरठ्यावर आहे. अवेळी व सतत पाऊस, धुई, पानगळ, लाल पडलेली पाने आदींमुळे झाडांची अन्नद्रव्य तयार करण्याची क्रिया थांबली. त्यामुळे यंदा निम्म्यापेक्षा जास्त उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कापसात कवडीचे प्रमाणही असल्याचे चित्र मराठवाड्यात आहे. 

औरंगाबाद व लातूर कृषी विभागांतर्गत आठ जिल्ह्यात १७ लाख ७६ हजार हेक्‍टरवर कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्या तुलनेत यंदा मराठवाड्यात १५ लाख ६५ हजार ९८८ हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये आलेल्या पावसाने काही भागातील कपाशीच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु, ऑक्‍टोबरमध्ये जवळपास पंधरवड्यापेक्षा जास्त काळ सतत पाऊस झाला. त्यामुळे कपाशीचे मोठे नुकसान झाले. सुमारे १४ लाख ६६ हजार हेक्‍टरवरील कपाशीचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पिकांना फटका बसला. जमिनीतील नत्र वाहून गेले. ते पिकाच्या मुळाच्या कक्षेच्या खाली जाऊन बसले. 

मॅग्नेशिअमची कमतरता व दहिया रोगाचा प्रादुर्भाव, यामुळे  झाडावर पात, फुले, बोंड असतानाच अन्नद्रव्याची कमतरता भासली. त्यामुळे विविध रोगांना पोषक वातावरण निर्माण झाले. कपाशीची पाते व पानगळ झाली. अनेक भागांत लालसर पडलेल्या कपाशीच्या पिकाला जेवढी बोंडे आधी पोसली गेली, तेवढीच उत्पादन देऊन गेली. उर्वरित अन्नद्रव्य न मिळाल्याने पोसण्यापूर्वी फुटली. कापसाच्या उत्पादनात कवडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. त्याचा थेट फटका उत्पादनात बसला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com