औरंगाबाद जिल्ह्यात चार केंद्रांवरून कापूस खरेदी सुरू

Cotton procurement started from four centers in Aurangabad district
Cotton procurement started from four centers in Aurangabad district

औरंगाबाद : भारतीय कपास निगम लिमीटेड (सीसीआय) ची नोडल एजन्सी म्हणूक काम करणाऱ्या महाराष्‌ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या वतीने जिल्ह्यात चार ठिकाणी कापूस खरेदीला गुरुवारी(ता.२८) सुरुवात करण्यात आली. 

जिल्ह्यातील सिल्लोड, खामगाव फाटा, तुर्काबाद बालानगर येथे गुरुवारी कापूस खरेदीला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी सिल्लोड येथील केंद्रावर दुपारपर्यंत ३८ क्‍विंटल ९० किलो कापसाची हमी दराने खरेदी करण्यात आली. तुर्काबाद येथील केंद्रावर जवळपास पाचशे क्‍विंटलपर्यंत कापसाची खरेदी करण्यात आली. सिल्लोड येथे खरेदी केलेल्या कापसाला ५५५० रूपये प्रतिक्‍विंटलचा दर देण्यात आला. याचवेळी सिल्लोडमध्ये खासगी खरेदीत ४९०० ते ५५२२ रूपये प्रतिक्‍विंटलचा दर देण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

महाराष्‍‌ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या केंद्रावर येणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या कापसाची आर्द्रता ८ ते १२ टक्‍क्‍यांपर्यंत ठेवणे आवश्‍यक आहे. असाच कापूस विक्रीसाठी आणता येणार आहे. १२ टक्‍क्‍यांपुढे आर्द्रता असणारा कापूस या केंद्रांवर स्विकारला जाणार नसल्याची माहिती कापूस पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली. 

सद्यस्थितीत येत असलेल्या कापसात १५ ते २० टक्‍क्‍यांपर्यंत आर्द्रता आढळत आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. कापूस विक्रीसाठी घेवून येताना अद्यावत सातबारा, आधार कार्ड, पासबुक झेरॉक्‍स शेतकऱ्यांना सोबत आणावे लागेल. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या कार्यालयांतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील चार खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात लवकरच नगर जिल्ह्यातील चापडगाव व मिरजगाव येथे कापूस खरेदी केंद्र सुरू केली जातील. 

राज्यभरात ४० केंद्रावर खरेदी 

महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या वतीने राज्यभरात ४० केंद्रावरून कापसाची खरेदी करण्यात येणार आहे. सीसीआयच्या माध्यमातून ६३ केंद्रावरून उत्पादित कापसाची खरेदी केली जाईल. १० केंद्रे अगदी अत्यावश्‍यकता भासल्यास सुरू केले जातील, अशी माहिती महाराष्र्ट राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com