शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेणार : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेणार : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेणार : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत देणार आहे. यासाठी मोठा निर्णय घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गुरूवारी येथे केली. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले,''शेतकऱ्यांना योजनांच्या माध्यमातून दिल्या जात असलेल्या योजनांच्या निधीच्या माहिती संकलनाचे आदेश दिले आहे.'' तसेच आपले सरकार सर्वसामान्यांसाठी काम करेल आणि राज्यात कुणाला दहशत वाटेल असे वातावरण राहू देणार नाही, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ठाकरे यांनी गुरूवारी (ता.२८) 'सह्याद्री' अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडच्या विकासासाठी आणखी २० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर बोलताना ठाकरे म्हणाले, अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य उध्दवस्त झाले आहे. बैठकीत पीक नुकसानीचा आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या दु:ख समजून घेण्यासाठी आपण याआधी दौरे केले आहेत. मात्र, त्यावेळी हातात काही नसल्याने आपण दिलासा देण्याशिवाय काही करू शकत नव्हतो. आता मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्याच बैठकीत आपण मुख्य सचिवांना शेतकऱ्यांसाठी ज्या योजना लागू केल्या आहेत त्याचे वास्तववादी चित्र समोर आणण्याचे निर्देश दिल्याचे ठाकरे म्हणाले. आम्हाला शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करायची नाही. त्यांना आनंद वाटेल, समाधान लाभेल अशी मोठी मदत द्यायची आहे. आतापर्यंत मदतीच्या अनेक घोषणा झाल्या, परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्यांच्या हक्काची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे वास्तवादी चित्र समोर आल्यानंतर आपले सरकार येत्या दोन दिवसात शेतकर्यांच्या संदर्भात निर्णय घेईल, असे ठाकरे यांनी सांगितले.

फडणवीस यांना प्रत्यूत्तर- दरम्यान, मंत्रिमंडळ हे संपूर्ण राज्याचे असते. मंत्रिमंडळ कोणत्या विभागाचे नसते. त्यामुळे पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्यांनी अभ्यास करून बोलावे, असे प्रत्यूत्तर ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com