शेतकरी हित, रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य

Farmer's interest, employment is the highest priority
Farmer's interest, employment is the highest priority

मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा किमान समान कार्यक्रम महाविकास आघाडीने गुरुवारी (ता. २८) जाहीर केला. शेतकरी कर्जमाफी, पीक विमा योजनेची पुर्नरचना, शेतीमालाला योग्य भाव आणि दुष्काळी भागाला संजीवनी देणारी शाश्वत पाणी योजना त्यासोबतच बेरोजगारी, उद्योग वृद्धी, महिला सुरक्षा, आरोग्य, शिक्षण आदींच्या बाबतीत महाराष्ट्राला विकासाच्या मार्गाने पुढे घेऊन जाणार असल्याचे आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. उद्धव ठाकरे सरकारच्या शपथविधीच्या काही तास आधी महाविकास आघाडीने किमान समान कार्यक्रम जाहीर केला. 

या तिन्ही नेत्यांनी सविस्तरपणे आघाडीच्या विकासाचा अजेंडा मांडला. यात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र विकास आघाडीचा प्रत्येक निर्णय हा भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकात सांगितलेल्या मूल्यांना धरुन असेल. या आघाडीची स्थापनाच या मूल्यांच्या आधारावर करण्यात आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील जनतेच्या हितासाठी काम करणारी आघाडी असेल. या आघाडीच्या प्रत्येक निर्णयामध्ये भारतीय संविधानात सांगितलेली मूल्ये आणि तत्व केंद्रस्थानी असतील.

या आघाडीचा मुख्य कार्यक्रम महाराष्ट्राला विकासाच्या मार्गाने पुढे घेऊन जाणे हा असेल. महाराष्ट्र विकास आघाडीचे निर्णय समाजातील सर्व घटकांसाठी समान असणार आहेत. यामध्ये भाषा, जात, धर्म आदी कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. आज राज्यात वाढलेली बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेची सुरू असलेली घसरण यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष वाढला आहे. या विद्यमान परिस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीनही पक्ष महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे राज्याच्या विकासाला नवी दिशा देणार आहेत. ही आघाडी या देशातील, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेचे प्रतिबिंब आहे. कोणालाही भीती वाटणार नाही, कोणालाही झुकते माप देणार नाही, सर्व समाजघटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणे हाच महाराष्ट्र विकास आघाडीचा मुख्य उद्देश आहे. तसेच महाराष्ट्र विकास आघाडीने आखलेल्या कार्यक्रमाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समन्वय समिती केंद्र आणि राज्यातील संवेदनशील विषयांवर मार्गदर्शन करणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

किमान समान कार्यक्रमातील ठळक वैशिष्ट्ये  शेती 

  •   अवकाळी पावसामुळे व पुरामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देणार.
  •  शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार.
  •  ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या सर्व शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा याकरीता पीकविमा योजनेची पूर्नरचना करणार. 
  • शेतकऱ्याच्या शेतमालास योग्य भाव मिळण्यासाठी उपाययोजना करणार.
  • सातत्याने दुष्काळग्रस्त होणाऱ्या तालुक्यांना पाणी पोहचविणारी यंत्रणा उभारण्यासाठी भरीव तरतूद करणार.
  • बेरोजगारी

  • राज्य शासनातील सर्व स्तरावरील रिक्त पदे त्वरीत भरणाऱ्याची प्रक्रिया सुरू करणार.
  • सुशिक्षीत बेरोजगार युवकांना फेलोशिप देणार.
  • नोकऱ्यांमध्ये ८० टक्के भूमीपूत्रांना संधी मिळावी याकरीता कायदा करणार.
  • महिला

  • महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणार.
  • आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामूल्य करणार.
  •  महानगरे व जिल्हा मुख्यालयांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे बांधणार.
  •    अंगणवाडी सेविका/आशा सेविका व आशा गट प्रवर्तक यांच्या मानधनात व सेवा सुविधेमध्ये वाढ करणार.
  • महिला बचत गट सक्षमीकरणासाठी सर्वोच्च प्राधान्य
  • शिक्षण

  •  शिक्षणाचा दर्जा उंचविणार
  • आर्थिल दुर्बल घटक व शेतमजुरांच्या मुलांसाठी उच्च शिक्षणासाठी शुन्य टक्के व्याजदर कर्ज योजना
  • आरोग्य

  •  सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी सर्व चाचण्यांची सुविधा देणेसाठी तालुका पातळीवर एक रूपया क्लिनिक योजना सुरू करणार.
  • सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्या टप्प्याने वैद्यकीय महाविद्यालयासह सुपर स्पेशालिटी रुग्णालये उभारणार.
  • राज्यातील प्रत्येक नागरिकास आरोग्य विमा कवच देणार.
  • उद्योग

  •  उद्योग वाढीसाठी नवीन गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी तसेच राज्यात उद्योग धंदे वाढीसाठी जास्तित जास्त सवलती देण्याचे व परवानगी प्रक्रिया सुलभ करण्याचे धोरण राबविणार.
  •  आयटी क्षेत्रात नवीन गुंतवणुकदार यावेत याकरीता आयटी धोरणामध्ये आवश्यक सुधारणा करणार.
  • सामाजिक न्याय

  •  भारतीय संविधानात अभिप्रेत असलेल्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य व रोजगार या मूलभूत गरजांपासून सामान्य माणूस वंचित राहू नये म्हणून अनुसूचित जाती व जमाती, धनगर, इतर मागासवर्ग (ओबीसी), भटके विमुक्त, बलुतेदार इत्यादी समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडविणार
  • अल्पसंख्याक समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासपण दूर करण्यासाठी शासन विविध योजनांचा अवलंब करणार.
  • आणि इतर महत्वाचे

  • ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांमध्ये वाढ करणार.
  • प्रगत देशाच्या धर्तीवर अन्न व औषधी नियमावलींची पायमल्ली करणाऱ्या संस्था व व्यक्तिंना कडक शिक्षा करण्याची तरतूद करणार.
  •  राज्यात सर्वसामान्यांसाठी स्वस्त व सकस जेवणाची थाळी १० रूपयात देण्याची व्यवस्था.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com