जागतिक देशी गोवंश परिषदेला आजपासून पुण्यात सुरुवात 

indigenous cattle
indigenous cattle

पुणे ः जातिवंत दुधाळ भारतीय गोवंश संवर्धनाच्या बरोबरीने दूध, तूप तसेच गोमूत्र आणि शेणाचा विविध उत्पादनांच्यामधील नवीन तंत्र पशुपालक आणि ग्राहकांच्यापर्यंत पोचविण्यासाठी कामधेनू सेवा प्रतिष्ठान या संस्थेने पुणे शहरातील बालेवाडी येथे जागतिक देशी गोवंश परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. आज (ता. २९) पासून या परिषदेला सुरुवात होत असून १ डिसेंबरपर्यंत चालणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक रत्नपारखी यांनी दिली. 

बालेवाडी येथील ग्यानबा सोपानराव मोझे कॉलेज समोरील मैदानात परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना रत्नपारखी म्हणाले, की राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथीरिया यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन होत आहे. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील, एमआयटीचे उपाध्यक्ष राहुल कराड उपस्थित रहाणार आहेत. 

राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथीरिया म्हणाले, की देशभरातील जातिवंत गोवंश संवर्धन आणि संशोधनाला आम्ही चालना देत आहोत. एकात्मिक ग्राम विकास, गो आधारित शेती, विज्ञान आणि पर्यावरणाच्यादृष्टीने देशी गोवंशाचे संगोपन महत्त्वाचे आहे. 

परिषदेचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर म्हणाले, की देश-विदेशातील संशोधन संस्था भारतीय गोवंशाचा अभ्यास करत आहेत. हे लक्षात घेऊन या परिषदेमध्ये देशी गोवंश सुधारणा, रेतमात्रांचे उत्पादन तंत्र तसेच प्रक्रिया उद्योगाच्यादृष्टीने विविध विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. 

कामधेनू सेवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजय ठुबे म्हणाले, की प्रदर्शनामध्ये देशभरातील जातिवंत गोवंश पाहायला मिळणार आहेत. गोशाळेचे नियोजन, गाईंचे आरोग्य, आहार व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योगाची उभारणीबाबत तज्ज्ञ माहिती देणार आहेत. परिषदेमध्ये बायफ, माफसू, गोविज्ञान संस्था, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभागातील तज्ज्ञदेखील विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com