agriculture news in Marathi minimum temperature more than average Maharashtra | Agrowon

किमान तापमान सरासरीच्या वरच 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान होत आहे. यातच उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा अभाव आणि पूर्वेकडून वाहणारे उष्ण व दमट वारे यांमुळे राज्यात गारठा वाढलेला नाही. दुपारी उन्हाचा चटका वाढत असल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे. राज्याच्या बहुतांशी भागात किमान तापमानाचा पारा सातत्याने सरासरीच्या वरच असल्याचे दिसून आले आहे. 

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान होत आहे. यातच उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा अभाव आणि पूर्वेकडून वाहणारे उष्ण व दमट वारे यांमुळे राज्यात गारठा वाढलेला नाही. दुपारी उन्हाचा चटका वाढत असल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे. राज्याच्या बहुतांशी भागात किमान तापमानाचा पारा सातत्याने सरासरीच्या वरच असल्याचे दिसून आले आहे. 

गुरुवारी (ता. २८) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानातील वाढ कायम असल्याने राज्यातील थंडी लांबली आहे. नोव्हेंबर महिना संपत आला तरी राज्यात कडाक्याची थंडी पडलेली नाही. कोकण, मराठवाडा, विदर्भाच्या बहुतांशी भागांत कमाल तापमान ३० अंशाच्या पुढेच आहे. तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमान ३० अंशांच्या खाली आले होते. 

गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील सर्वाधिक ३४.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. कर्नाटकातील मंगळूर येथे देशातील सर्वाधिक ३७.२ अंश सेल्सिअस, तर राजस्थानातील जैसलमेर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १०.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. ढगाळ हवामान आणि तापमानात झालेल्या वाढीमुळे रात्रीही उकाडा जाणवत आहे. पहाटे तापमानात घट होत असली तरी गारठा चांगला वाढलेला नाही. 

गुरुवारी (ता. २८) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १५.३ (३), धुळे १३.५, जळगाव १६.२ (३), कोल्हापूर १९.१ (३), महाबळेश्वर १४.९ (१), मालेगाव १७.० (४), नाशिक १६.४ (४), सांगली १८.७ (३), सातारा १७.० (२), सोलापूर १९.१ (३), अलिबाग २२.२ (२), डहाणू २२.९ (३), सांताक्रूझ २२.४ (३), रत्नागिरी २३.२ (२), औरंगाबाद १४.७ (१), परभणी १५.४ (१), नांदेड १७.० (३), उस्मानाबाद १३.६ (१), अकोला १५.५ (०), अमरावती १६.२ (-१), बुलडाणा १७.० (१), चंद्रपूर १७.६ (३), गोंदिया १५.५ (०), नागपूर १४.७ (१), वर्धा १६.६ (१), यवतमाळ १५.४ (-१). 
 


इतर अॅग्रो विशेष
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...
राज्यातील बाजार समित्या निवडणुका पुढे...पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका...
अण्णासाहेब पाटील महामंडळाने १०००...नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास...
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
‘पोकरा’मध्ये अखेर जबाबदाऱ्यांचे विभाजनअकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी...
कृत्रिम रेतन नियंत्रण कायदा कधी? पुणे: पशुधनाच्या आरोग्याला घातक असलेली सध्याची...
किमान तापमानात होतेय घटपुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी...
सात-बारा कोरा करण्याची सुबुद्धी सरकारला...पंढरपूर, जि. सोलापूर: विधानसभा...
सरकारी पीकविमा कंपनी हवी : शेतकरी...नागपूर ः खासगी कंपन्या तयार नसतील तर केंद्राने...